शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

पीडित मुलीच्या कुटुंबीयांवर दबाव

By admin | Updated: August 30, 2015 01:54 IST

धगडगन येथील बलात्कार प्रकरणातील आरोपी नरेश शिरोडे याच्या नातलगांकडून पीडित मुलीच्या कुटुंबीयांवर प्रकरण मागे घेण्याकरिता दबाब टाकण्यात येत असल्याचे म्हणत ...

धगडबन येथील बलात्कार प्रकरण : नागरिकांचे ठाणेदारांना साकडे; कारवाईची मागणीसमुद्रपूर : धगडगन येथील बलात्कार प्रकरणातील आरोपी नरेश शिरोडे याच्या नातलगांकडून पीडित मुलीच्या कुटुंबीयांवर प्रकरण मागे घेण्याकरिता दबाब टाकण्यात येत असल्याचे म्हणत गावकऱ्यांनी शनिवारी ठाणेदारांना निवेदन सादर केले. या प्रकरणातील आरोपीला जामीन नाकारून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आलीपीडित युवतीच्या परिवारातील सदस्यांना खोट्या गुन्ह्याखाली अडकविण्याची धमकी देण्यात येत आहे. यामुळे गावात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून ठाणेदार आर.टी. चव्हाण यांना निवेदनातून करण्यात आली आहे.गेल्या बुधवारी नरेश शिरोडे याने अल्पवयीन मुलीवर धगडबन शिवारात जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला होता. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी तत्परता दाखवित नराधम नरेश याला तत्काळ अटक केली. त्यानंतर आरोपीच्या नातेवाईकांनी मुलीच्या कुटुंबीयांसह धगडबन येथील नागरिकांना खोट्या बलात्काराची तक्रार दाखल करून अडकविण्याची धमकी देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे. आरोपीचे वडील, आई व पत्नी पीडित मुलीच्या कुटुंबीयांवर तक्रार मागे घेण्याकरिता दबाव आणत असल्याचाही आरोप आहे. शनिवारी (ता. २९) माजी आमदार अशोक शिंदे यांच्या नेतृत्वात शेकडो पुरूष व महिलांनी ठाणेदारांना भेटून आरोपीला जामीन न देता कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवदेन देतेवेळी यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र लढी, सुभाष कुकडे, पांडुरंग फलके, नरेश शिंदे, दीपक धोटे, सचिन धोटे, श्यामराव पोटे, प्रितम जोगे यांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकीया प्रकरणातील आरोपीच्या परिवारातील सदस्यांकडून पीडित मुलीच्या कुटुंबीयांना व त्यांना सहकार्य करणाऱ्या गावकऱ्यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देण्यात येत असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. या प्रकारामुळे गावातील वातावरण चिघळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे सदर नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.