शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराला अटक

By admin | Updated: January 7, 2016 02:44 IST

दारूबंदीच्या प्रकरणातून साळ्याचे नाव वगळण्यात यावे, यासाठी १० हजार रुपयांची लाच मागण्यात आली.

एसीबीची कारवाई : १० हजारांची मागणीवर्धा : दारूबंदीच्या प्रकरणातून साळ्याचे नाव वगळण्यात यावे, यासाठी १० हजार रुपयांची लाच मागण्यात आली. या प्रकरणात स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने सेवाग्राम पोलीस ठाण्यातील दारूबंदी पथकाच्या प्रमुख पोलीस हवालदारास अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवारी सकाळी करण्यात आली. महेंद्र पुरूषोत्तम कांबळे (४४) असे पोलीस हवालदाराचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सेवाग्राम पोलीस ठाण्यातील दारूबंदी पथकाचे प्रमुख पोलीस हवालदार महेंद्र कांबळे याने तक्रारकर्त्यांच्या साळ्याला दारूबंदी प्रकरणातून वगळण्यासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी १८ डिसेंबर २०१५ रोजी केली होती. याबाबत तडजोड केल्यानंतर ४ हजार रुपये देण्याची बाब तक्रारकर्त्याने मान्य केले. या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सेवाग्राम पोलीस ठाण्यात लाच मागितल्या प्रकरणी महेंद्र कांबळे याला अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजीव जैन, उपअधीक्षक स्वप्निल धुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक, अनिरूद्ध पुरी, सारंग दुर्गे, पोलीस शिपाई कुणाल डांगे, पल्लवी बोबडे, श्रीधर उईके यांनी केली. यापूर्वी ५०० रुपयांची लाच घेताना सेवाग्राम पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई गिरधर पचारे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. सेवाग्राम पोलीस ठाण्यातच लाच मागण्याची दोन प्रकरणे झाल्याने तेथील कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)