शारीरिक खेळामुळेच होतो मानसिक विकास

By Admin | Updated: May 5, 2016 02:17 IST2016-05-05T02:17:38+5:302016-05-05T02:17:38+5:30

मुलांना लहानपणापासूनच मधुमेह व लठ्ठपणा यासारखे विविध आजार होत असल्याचे माहितीतून पुढे आले आहे.

Physical development is due to mental sports | शारीरिक खेळामुळेच होतो मानसिक विकास

शारीरिक खेळामुळेच होतो मानसिक विकास

रंजना दाते : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता क्रीडा प्रशिक्षणाचे धडे
सेलू : मुलांना लहानपणापासूनच मधुमेह व लठ्ठपणा यासारखे विविध आजार होत असल्याचे माहितीतून पुढे आले आहे. त्यांचा मानसिक व शारीरिक विकास खुंटत असून त्यासाठी लहानपणापासून विविध खेळाची व व्यायामाची गरज आहे. नियमित खेळ व व्यायामामुळे माणूस आरोग्यमुक्त होतो, असे विचार मुख्याध्यापिका रंजना दाते यांनी व्यक्त केले.
येथील यशवंत महाविद्यालयात ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी मोफत क्रीडा प्रशिक्षण घेण्यात आले. या उपक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात खेळाडूंना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, यशवंत महाविद्यालय व यशवंत हायस्कूल, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात आला. प्राचार्य सतीश रघुवंशी व मुख्याध्यापिका रंजना दाते यांच्या मार्गदर्शनात तालुकास्तरीय क्रीडा प्रशिक्षण घेण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. राजेंद्र मुंढे, पर्यवेक्षक जी.जी. गुजर, प्रा. दीक्षित, मुख्य प्रशिक्षक अनंत भाकरे, आर.एन. भोयर, प्रा. फाळके उपस्थित होते.
आयोजक प्रा. अर्चना फाळके यांनी प्रास्ताविकातून शिबिर आयोजनाचा उद्देश सांगितला. माहिती व तंत्रज्ञानाच्या या युगात विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होतो. परंतु शारीरिक विकास त्याप्रमाणात होत नाही. विद्यार्थ्यांमधील शारीरिक क्षमता वाढवून त्यांच्यामध्ये क्रीडाविषयक कौशल्य निर्माण व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षण उपक्रमात विविध शाळा व महाविद्यालयातील ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यातून मैदानी खेळ, खो-खो, कबड्डी, लंगडी या खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अनंत भाकरे, प्रवीण भोयर, प्रा. चामचोर, सागर राऊत, निसार सय्यद, शुभम धोटे, सारंग यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन एम.सी. नाखले यांनी तर आभार अनंत भाकरे यांनी मानले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Physical development is due to mental sports