शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कौंडण्यपूरची पालखी निघाली पंढरपूरला

By admin | Updated: June 15, 2014 23:41 IST

विदर्भातील एकमेव तीर्थक्षेत्र असलेल्या कौंडण्यपूर येथील रूख्मिणी मातेची पालखी आषाढी यात्रेकरिता श्रीक्षेत्र पंढरपूरसाठी रवाना झाली आहे़ या पालखीचे नेतृत्व गुरूवर्य हभप रंगराव महाराज टापरे करीत आहेत़

पाऊले चालती़़़ : वारकऱ्यांना लागले विठ्ठलाच्या दर्शनाचे वेधटाकरखेड : विदर्भातील एकमेव तीर्थक्षेत्र असलेल्या कौंडण्यपूर येथील रूख्मिणी मातेची पालखी आषाढी यात्रेकरिता श्रीक्षेत्र पंढरपूरसाठी रवाना झाली आहे़ या पालखीचे नेतृत्व गुरूवर्य हभप रंगराव महाराज टापरे करीत आहेत़पंढरपूर येथील आषाढी यात्रेत सहभागी होण्यासाठी निघालेल्या पायदळ दिंडी पालखीचा प्रवास एक महिन्याचा आहे़ या प्रवासादरम्यान रात्रीचा मुक्काम मिर्चापूर, मार्डी, अमरावती, बडनेरा, लोणी, धनज खुर्द, वाढोणा, कारंजा (लाड), शिवनी, मंगरूळनाथ, कासोडा, वाशिम, कन्हेरगाव, भांडेगाव, हिंगोली, ओंढा, हट्टा, नया मोठा, दैठना, गोदातट, परभणी, परळी, बैजनाथ, अंबेजोगाई, पळसखेडा, कळंब, कन्हेरवाडी, पाथरी, बार्शी, खांडवी, माढा, शेतफळ, बाभुळगाव व ४ जुलै रोजी पंढरपूर येथे प्रवेश, असा आहे़ या दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक मंडळी सहभागी झाली आहे़ पंढरपूर यात्रेसाठी टाळ-मृदंगाच्या तालावर विठ्ठल-रूख्मिणी मातेचा गजर करीत मोठ्या आनंदाने पायी प्रवास करीत आहेत़ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निघालेल्या पालखीचा ज्या ठिकाणी रात्री मुक्काम आहे, त्या गावातील नागरिकांनी अन्नदान, अल्पोपहार आणि चहापाण्याची व्यवस्था केली आहे़ शिवाय या दिंडी सोहळ्यातील भाविक व वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याकरिता विठ्ठल रूख्मिणी संस्थान कौंडण्यपूरचे विश्वस्त वासुदेव दौंड, सचिव नामदेव अमाळकर तसेच संचालक सदस्य विशेष लक्ष देत सहकार्य करीत आहे़ पालखी सहायक हभप नरेंद्र महाराज वानखडे, ज्ञानेश्वर महाराज पांडे व वारकरी मंडळी मार्डी सहकार्य करीत आहेत़ कौंडण्यपूरहून निघालेल्या माता रूख्मिणीच्या या पायदळ वारीने परिसरातील वातावरणही भक्तीमय झाले होते़(वार्ताहर)