शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण सापडण्याची गती वाढली; पण परिस्थिती ‘इन कंट्रोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 05:00 IST

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात दररोज द्विशतकाहून अधिक कोविड बाधित नवीन रुग्ण सापडत आहेत. नवीन कोविड बाधितांपैकी लक्षण विरहीत तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तिंना स्वयंघोषणा पत्र भरून दिल्यावर गृहअलगीकरणात ठेवले जात आहे. ज्या कोविड बाधिताच्या घरी अलगीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही, अशा व्यक्तिंना सध्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

ठळक मुद्देबेड्स मुबलक; चिरीमिरीच्या गैरप्रकाराला सध्यातरी थारा नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  जिल्ह्यात सध्या कोविडबाधित नवीन रुग्ण सापडण्याची गती वाढली आहे. त्यामुळे सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयातील रुग्णखाटा फुल्ल होत आहेत. असे असले तरी सध्या जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती ‘इन कंट्रोल’ असल्याने   तसेच दोन्ही रुग्णालयात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड उपलब्ध असल्याने पैसे द्या अन् बेड्स उपलब्ध करून घ्या, या चिरीमिरीच्या गैरप्रकाराला थारा नसल्याचे आरोग्य यंत्रणेतील सुत्रांनी सांगितले.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात दररोज द्विशतकाहून अधिक कोविड बाधित नवीन रुग्ण सापडत आहेत. नवीन कोविड बाधितांपैकी लक्षण विरहीत तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तिंना स्वयंघोषणा पत्र भरून दिल्यावर गृहअलगीकरणात ठेवले जात आहे. ज्या कोविड बाधिताच्या घरी अलगीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही, अशा व्यक्तिंना सध्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यामुळे सध्यातरी मोठा ताण कोविड रुग्णालयांवर ओढवलेला नाही. असे असले तरी गंभीर रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.सध्यास्थितीत त्रिसूत्रींचे पालन आवश्यकचसध्याच्या कोरोना काळात प्रत्येक नागरिकाने वारंवार हात धुणे, मास्कचा वापर करणे तसेच सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. तसे आवाहनही जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

जिल्ह्यात सध्या कोविड बाधित नवीन सापडण्याची गती वाढली आहे. असे असले तरी सध्या जिल्ह्याची परिस्थिती इन कंट्रोल आहे. परंतु, नागरिकांनी गाफील न राहता जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले पाहिजे. नागरिक गाफील राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही, हे नागरिकांनी समजून घेतले पाहिजे.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या