शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापासून कार्यभार प्रभारावरच

By admin | Updated: May 25, 2015 02:07 IST

महावितरणच्या वर्धा उपविभागांतर्गत येणाऱ्या येळीकेळी येथील कनिष्ठ अभियंत्याची बदली होवून वर्ष होत आहे.

 तारेवरची कसरत : महावितरणच्या येळाकेळी कार्यालयातील प्रकार आकोली : महावितरणच्या वर्धा उपविभागांतर्गत येणाऱ्या येळीकेळी येथील कनिष्ठ अभियंत्याची बदली होवून वर्ष होत आहे. पण अद्यापही कनिष्ठ अभियंत्याची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे महावितरणाचा गाडा प्रभारावर हाकणे सुरू आहे. शिवाय लाईनमन व मदतनीसांचा सुद्धा अनुशेष असल्यामुळे प्रभारीला तारेवर कसरत करावी लागत आहे.महाविरणच्या येळीकेळी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात १४ गावे येतात. परिसरातील गावात बागायतदार शेतकऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. असे असताना महावितरणे कनिष्ठ अभियंत्याचे पद वर्षभरापासून रिक्तच ठेवले. येथील प्रभार आंजी एकचे राजुरकर व आंजी दोनचे जयपूरकर यांना एक-एक महिन्यासाठी देण्यात येतो. आंजी १ व २ चे कार्यक्षेत्र सुद्धा मोठे आहे. शिवाय तेथील शेतकरी संवेदनशील आहे. त्यामुळे दोन ठिकाणचा गाडा हाकताना प्रभारींना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतो. येळीकेळी कार्यालयात लाईनमनचा सुद्धा मोठा अनुशेष आहे. १४ गावांचा डोलारा सांभाळायला अवधे सहा कर्मचारी आहे. त्यांना रात्र-रात्र जागून बिघाड निर्माण झाल्यास दुरुस्तीची कामे करावी लागतात. येथील काहीची बदली झाली तर काही लाईनमन सेवानिवृत्त झाले पण लाईनमनच्या रिक्त जागा भरण्यात आल्या नाही. महिन्यापूर्वी आकोलीचे लाईनमन चौधरी सेवानिवृत्त झाले पण त्यांच्या जागी अद्याप नव्याने कुणाची नियुक्ती करण्यात आली नाही. अशावेळी नागरिकांना आपली गाऱ्हानी, तक्रार कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंत्यालाच सांगावी लागते. त्यामुळे घरगुती व कृषी पंपाची वीज जोडणीची कामे प्रभावित झाली आहे. किरकोळ व गंभीर स्वरूपाचा विजेत बिघाड झाल्यास अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा भार येतो.(वार्ताहर)