शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार जागांसाठी केवळ ४० अर्जांची विक्री

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

काही वर्षांपूर्वी शिक्षक होण्याकरिता घ्याव्या लागत असलेल्या प्रशिक्षणासाठी रांगा लागत होत्या;

वर्धा : काही वर्षांपूर्वी शिक्षक होण्याकरिता घ्याव्या लागत असलेल्या प्रशिक्षणासाठी रांगा लागत होत्या; पण या रांगा आता हद्दपार झाल्या आहे़ आता कॉलेज चालविण्यासाठी डीटीएड कॉलेजच्या प्राध्यापकांवर विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे़ जिल्ह्यात डीटीएड्साठी दोन हजार जागा असताना अर्ज विक्रीचे तीन दिवस शिल्लक असताना केवळ ४० अर्ज विकले गेलेत़ यामुळे डीटीएड कॉलेजेसचे भविष्य टांगणीला लागल्याचे दिसते़ प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक पदावर रूजू होण्याकरिता पदवी म्हणून डीटीएड अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो़ पूर्वी या अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्यासाठी रांगा लागत होत्या़ टक्केवारी कमी असल्यास कित्येकांना प्रवेश मिळत नव्हते़ आता मात्र या अभ्यासक्रमातील प्रवेशाचे चित्रच बदलले आहे. डीटीएड्च्या प्रवेश प्रकियेकडे विद्यार्थी फिरकत नसल्याचे दिसते़ २ जूनपासून प्रवेश अर्जाची विक्री सुरू झाली असून ती १६ जूनपर्यंत चालणार आहे़ या कालावधीत जिल्ह्यात केवळ ४० अर्जांची विक्री झाली़ अर्ज विक्रीची तारीख संपण्यास तीनच दिवस आहेत. आता या तीन दिवसांत किती अर्जांची विक्री होईल, हे कळणार आहे़ अर्जांची विक्री घटल्यास प्रवेशावरही निश्चितच परिणाम होण्याची शक्यता आहे. यावर्षी डीटीएड् कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्राध्यापकांना भटकंती करावी लागतेय़(कार्यालय प्रतिनिधी)