ऑनलाईन शस्त्रविक्रीचा गोरखधंदा जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 05:00 AM2020-03-09T05:00:00+5:302020-03-09T05:00:22+5:30

पोलीस विभाग ऑनलाईन शस्त्र विक्री थांबविणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वर्धा शहरात अल्पवयीन मुलांमध्ये शस्त्रांबाबत विशेष आकर्षण दिसून येते. शाळा, महाविद्यालयस्तरावर अल्पवयीन मुलेही घातक शस्त्रे बाळगून असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. शहरातील टोळ्यांमध्येही वर्चस्वासाठी शस्त्राची जुळवाजुळव सुरू आहे. प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला करण्याची संधी या टोळ्या शोधत आहे.

Online Weapons Sealing very broad | ऑनलाईन शस्त्रविक्रीचा गोरखधंदा जोमात

ऑनलाईन शस्त्रविक्रीचा गोरखधंदा जोमात

Next
ठळक मुद्देहोणार का कारवाई ? : विविध शॉपिंग साईट्सवर सर्रास विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरासह जिल्ह्यात वर्चस्ववादातून गुन्हेगारी फोफाळली आहे. कोणताही शस्त्र परवाना नसतानासुद्धा गुन्हेगार सर्रास विविध ऑनलाईन शॉपींग साईट्सवरून शस्त्र खरेदी होत आहे. शहरात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये चायनीज चाकूचा वापर झाल्याचे दिसून आले असताना हे चायनीज चाकू येतात कुठून, याची खरेदी कशी होते, हे तपासण्याची गरज आहे. पोलीस विभाग ऑनलाईन शस्त्र विक्री थांबविणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वर्धा शहरात अल्पवयीन मुलांमध्ये शस्त्रांबाबत विशेष आकर्षण दिसून येते. शाळा, महाविद्यालयस्तरावर अल्पवयीन मुलेही घातक शस्त्रे बाळगून असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. शहरातील टोळ्यांमध्येही वर्चस्वासाठी शस्त्राची जुळवाजुळव सुरू आहे. प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला करण्याची संधी या टोळ्या शोधत आहे.
पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी थेट शस्त्रांची ऑनलाईन खरेदी सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी म्हाडा कॉलनी येथे समीर मेटांगळे याचा खून करण्यात आला होता. मागील वर्षी इतवारा तसेच इंदिरा मार्केट परिसरात झालेल्या खुनाच्या घटनेतही चायनीज चाकू वापरण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. तसेच इतरही घटनांमध्ये आरोपींनी चायनीज तलवारी, चाकू वापरल्याचे उघड झाले आहे. गुन्हेगारी जगतातील अंतर्गत कुरघोड्या लक्षात घेता काहींनी अवैध शस्त्र विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. ऑनलाईन शस्त्र खरेदी करायचे, आणि ते दुप्पट दरात विक्री करायची, हा व्यवसाय जोरात सुरू आहे. चाकू, तलवार, बिछवे आदींसह विविध प्रकारच्या शस्त्रांची उलाढाल मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
शोभेच्या वस्तू म्हणून तलवार, गुप्ती, जांबिया अशी धारदार शस्त्रे सहजपणे मागविता येतात. याच माध्यमातून शहरात शस्त्रांचा पुरवठा होत असल्याचे पुढे आले आहे. भारतीय कायद्यानुसार अशी शस्त्र मागविता येत नाही. शोभेसाठी विकता येतात. त्याचाही परवाना काढावा लागतो. मात्र, नियमांची पायमल्ली करीत शहरातील गुन्हेगार ऑनलाईनद्वारे घरपोच शस्त्र मागवित असल्याचे दिसून येते. त्यामुळे शहरात घडणाऱ्या विविध गंभीर घटनांमध्ये चायनीज किंवा बटनवाल्या चाकूचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. शहरात अनेक युवकांकडून ऑनलाईन शस्त्रं मागविल्या जात असून अशांची यादी तयार करून ऑनलाईन मिळणाऱ्या शस्त्रांवर रोख लावण्याची मागणी युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे निहाल पांडे, गौरव वानखेडे, सोनू दाते, अक्षय बाळसराफ, विशाल इचपाळे, हेमंत भोसले, तेजस येखंडे यांनी केली आहे.

शस्त्र बाळगण्याची ‘क्रेझ’
अल्पवयीनांमध्ये वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी शस्त्र बाळगण्याची ‘क्रेझ’ निर्माण झाली आहे. प्रतिस्पर्ध्यांमध्ये वचक निर्माण करण्यासाठी तसेच ‘भाई’गिरीचे भूत चढलेल्यांमध्ये विविध आकर्षित शस्त्रे बळगण्याची भुरळ पडली आहे. अनेकांकडे विनापरवाना पिस्तुल देखील आहेत. पोलिसांनी अशांवर कारवाई करण्याची गरज आहे.

Web Title: Online Weapons Sealing very broad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onlineऑनलाइन