शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामानामुळे कांदा पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:00 IST

काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याचे महागडे बियाणे आणून टाकले होती. परंतु, या ढगाळ वातावरणामुळे कांद्याचे रोप व लावलेल्या कांद्याची पाल पिवळी पडून करपू लागली आहेत. शेतकरी बुरशीजन्य औषधाची फवारणी करीत आहेत. पालीवर करपा आणि गाभ्यामध्ये माव्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

ठळक मुद्देपिके पडली पिवळी : करपा रोगानेही घातले थैमान, शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे शेतातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने परिसरातील शेतकरी चिंतातुर झाला आहे. शेतातील पीक वाचविण्यासाठी औषधांची फवारणी करीत पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केल्यानंतर औषधांची फवारणी करून कांदा पिकात सुधारणा झाली होती. परंतु, या ढगाळ वातावरणामुळे कांद्याची पाल पिवळी पडून त्याच्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याचे महागडे बियाणे आणून टाकले होती. परंतु, या ढगाळ वातावरणामुळे कांद्याचे रोप व लावलेल्या कांद्याची पाल पिवळी पडून करपू लागली आहेत. शेतकरी बुरशीजन्य औषधाची फवारणी करीत आहेत. पालीवर करपा आणि गाभ्यामध्ये माव्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस व जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ज्या शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली होती, त्या शेतकऱ्यांचा कांदा निघाला असून काहींची काढणी सुरू आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे वाहतूक ठप्प आहे. परिणामी, अनेकांचा काढणी करून ठेवलेला कांदा शेतातच पडून आहे. तर काही शेतकऱ्यांनी कांदा लागवड १५ जानेवारीपासून ते फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत केली आहे. त्या शेतकºयांची कांदा जगविण्यासाठी धडपड सुरु आहे.परीसरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे असून सध्या सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. कांदा पिकावरच काही शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असल्यामुळे शेतकरी सध्या कांदा जगविण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे. तर काही शेतकरी कांदा निघूनही कोरोनामुळे सर्व ठप्प असल्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे.

टॅग्स :onionकांदाagricultureशेती