शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

१२ वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’

By admin | Updated: September 21, 2015 01:57 IST

महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा केला जातो. सार्वजनिक गणेश मंडळांद्वारे या उत्सवावर मोठा खर्च होतो.

अन्य गावांनी घ्यावा आदर्श : नागरिकांसह संपूर्ण व्यापाऱ्यांचेही लाभते सहकार्यसुधीर खडसे समुद्रपूरमहाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा केला जातो. सार्वजनिक गणेश मंडळांद्वारे या उत्सवावर मोठा खर्च होतो. यामुळेच एक गाव एक गणपती, ही संकल्पना समोर आली; पण त्यावर विशेष अंमल होताना दिसत नाही. असे असले तरी गावात मात्र एका तपापासून ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना रूजू आहे. यासाठीच येथील बाल गणेश उत्सव मंडळाला अनेक पुरस्कारांनीही गौरवान्वित करण्यात आले आहे.समुद्रपूर हे तालुक्याचे गाव असून येथे बारा वर्षांपासून एक गाव, एक गणपती स्थापन होत आहे. बाल गणेश मंडळाने १९९७ मध्ये मंडळाची स्थापना केली. हे बाल गणेश मंडळाचे १९ वे वर्ष आहे. १९९७ मध्ये प्रशांत झाडे, संजय खडसे, महेंद्र झाडे, दिनेश डहाके यांच्या पुढाकाराने मातीच्या मूर्तीच्या रूपात या उत्सवाला सुरूवात करण्यात आली होती. बारा वर्षांपासून अव्याहत या गणेश मंडळाकडून गणेशोत्सव भक्तीभावाने साजरा केला जात आहे. संपूर्ण गावात केवळ एकाच गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येत असल्याने या मंडळाला गावातील नागरिकांसह संपूर्ण व्यापाऱ्यांचे उत्तम सहकार्य लागत आहे. यामुळेच मंडळाचीही उत्तरोत्तर प्रगती होत असल्याचे दिसून येते.सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने एक गाव एक गणपती ही संकल्पना अस्तित्वात आणली. प्रारंभी या संकल्पनेला पुरस्कारही जाहीर करण्यात आले होते. या संकल्पनेला मूर्त रूप देण्याकरिता ग्रामपंचायत समुद्रपूर यांनी २००४ मध्ये पुढाकार घेतला. तेव्हापासून आजतागायत तालुक्याचे हे गाव एक गाव एक गणपती या संकल्पनेची जोपासना करीत आहे. सामाजिक बांधिलकी अंतर्गत या मंडळाच्यावतीने दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. यावर्षी बाल गणेश उत्सव मंडळाने मनमोहक मूर्तीची स्थापना केली आहे. या उत्सवात गावातील सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. तालुक्याचे स्थळ असताना एकाच गणेश मूर्तीची स्थापना होत असल्याने अन्य गावांनीही प्रेरणा घेत एक गाव एक गणपती संकल्पना राबविणे गरजेचे झाले आहे.