शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एका क्लिकवर मिळणार राज्यातील पेट्रोलपंपांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 19:52 IST

पेट्रोलपंपांवर होणारी ग्राहकांची लूट, भेसळ, अतिरिक्त इंधन साठा, कृत्रिम इंधन टंचाई आदी गोष्टींना आळा घालण्यासाठी लवकरच प्रत्येक पेट्रोलपंपावर वायरलेस प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकार्यान्वित होणार वायरलेस प्रणाली कामकाजात येणार पारदर्शकता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पेट्रोलपंपांवर होणारी ग्राहकांची लूट, भेसळ, अतिरिक्त इंधन साठा, कृत्रिम इंधन टंचाई आदी गोष्टींना आळा घालण्यासाठी लवकरच प्रत्येक पेट्रोलपंपावर वायरलेस प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे पेट्रोलपंपावरील कामकाजात पादर्शकता येणार असून एका क्लिकवर राज्यातील पेट्रोलपंपांची माहिती मिळणार आहे.ग्राहकांच्या तक्रारी लक्षात घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी भारत पेट्रोलियमने पेट्रोलपंपांवर आधुनिक वायरलेस प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वच पेट्रोलपंपांवर आॅटोमशन सेन्सर तंत्रज्ञान बसविण्यात येणार आहे. यामुळे थेट तेल कंपन्यांशी पेट्रोलपंप जोडले जाणार आहेत. पेट्रोलपंपांवर ग्राहकांच्या इंधनाबाबतच्या वाढत्या तक्रारी, वेळोवेळी पेट्रोलपंपांवरील कर्मचारी आणि वाहन चालक यांच्यात होणारे वाद, जिल्हा पुरवठा विभागाकडून तक्रारीचे वेळेत न होणारे निर्गतीकरण दखल घेत पेट्रोलियम मंत्रालयाच्या आदेशानुसार भारत पेट्रोलियमच्यावतीने पेट्रोलपंपांवर वायरलेस प्रणाली बसविण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

नवीन पंपांनाही करावा लागेल प्रणालीचा वापरनवीन पेट्रोल किंवा डिझेल पंपासाठीचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले जातात. असे असले तरी नवीन पंपांना मान्यता देत असताना या प्रणालीचा वापर करावा लागणार आहे.

‘फोर कोट’ म्हणून ओळखही अद्ययावत प्रणाली ‘फोर कोट’ म्हणून ओळखली जाणार आहे. यामुळे पेट्रोलपंपाचा असणारा इंधन साठा, ग्राहकांना विकलेले इंधन, किती वाजता विकले, किती मिनिटात दिले याची अचूक नोंद होणार आहे. या प्रणालीचा खर्च सहा लाख रूपये इतका असून तो खर्च कंपनी स्वत: करणार आहे. गैरप्रकार करणाऱ्या पंपधारकांच्या अडचणीत भर पडणार आहे.

विक्रीत येणार पारदर्शकतापेट्रोलपंपावर इंधन टाकत असताना रीडिंगमधील घोटाळ्यामुळे तेल कमी मिळाल्याच्या तक्रारी होऊन अनेकदा वादही होतात. परंतु, अत्याधुनिक प्रणालीव्दारे याला आता आळा बसणार आहे. या प्रणालीमुळे पेट्रोल, डिझेल विक्रीत पूर्णत: पारदर्शकता येणार आहे. जेवढ्या पैशाचे पेट्रोल ग्राहकांनी भरले असेल तेवढ्याच पेट्रोलची नोंद कंपनीकडे होणार आहे. यामुळे सदर अतिज्वलनशील पदार्थाचा काळाबाजार रोखण्यास मदत होणार आहे.

२४ तासांत मिळणार माहितीसदर सेन्सर प्रणालीमुळे टाकीतील इंधन साठा, पेट्रोल, डिझेलची होणारी दररोजची विक्री, खरेदी याची माहिती तेल कंपन्यांना कोड कंट्रोलर सर्व्हरद्वारे चोवीस तासांत मिळणार आहे.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंप