शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Top Marathi News Live: सोन्याची 'चांदी', प्रती तोळा ११ हजार रुपयांनी महागले
3
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
4
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
5
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
6
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
7
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदानीवरुन रूममेट्स भिडले
8
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
9
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
10
Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
11
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
12
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
13
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
14
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
15
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
16
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
17
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
18
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
19
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
20
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
Daily Top 2Weekly Top 5

सात कारवाईत दीड लाखांचा दारूसाठा जप्त

By admin | Updated: December 11, 2014 23:12 IST

जिल्ह्यात दारूबंदीकरिता तयार केलेल्या विशेष पथकाने दोन दिवसात सात ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत १३ जणांना अटक करण्यात आली असून त्यात १ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वर्धा : जिल्ह्यात दारूबंदीकरिता तयार केलेल्या विशेष पथकाने दोन दिवसात सात ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत १३ जणांना अटक करण्यात आली असून त्यात १ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंदी (रेल्वे) परिसरातील परसोडी येथे केलेल्या कारवाईत १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली. त्यांची नावे इक्बाल तझबीर अली, दिनेश वासुदेव नेवारे रा. सिंदी (रेल्वे), गजानन घुगरे, रवींंद्र हजारे रा. पवनार अशी असून इस्माईल रा. सिंदी (रेल्वे) हा फरार झाला.
सिंदी (मेघे) येथील दारूविक्रेते नागपूर येथून बसने दारू आणत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. या पथकाने पवनार येथील टी पॉर्इंटवर सापळा रचून माहिती असलेल्या बसची झडती घेतली असता त्यात सुभाष मोतीलाल कळसे रा. इंदिरानगर व अमोल रमेश दांडलेवार रा सिंदी (मेघे) या दोघांच्या हालचालीचा संशय आला. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत २८ हजार ८०० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे इंझापूर येथे केलेल्या कारवाईत पोलिसांनी एम एच ३२ ई ५२१५ क्रमांकाच्या गाडीची झडती घेतली असता तिच्यावर गावठी दारूची वाहतूक करताना बेनिप्रसाद उर्फ विनोद द्वारकाप्रसाद जालान रा. इंझापूर याला अटक करण्यात आली. त्याच्याजवळून १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राष्ट्रभाषा मार्गावर केलेल्या कारवाईत नानकराम संतानी याला अटक करून ३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वर्धा शहरातील इंगोले चौक येथे केलेल्या कारवाईत सचिन उर्फ गोलू कोमजपिल्लेवार रा. केळकरवाडी व चेतन उर्फ चिंटू कानेटकर रा. गांधीनगर याला अटक करण्यात आली. या दोघांजवळून २३ हजार २०० रुपयांची दारू व एमएच ३२ डब्ल्यू ३२२० क्रमांकाची दुचाकी असा एकूण ९३ हजार २०० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. पवनार येथे केलेल्या कारवाईत अशोक आत्माराम काटोले व अर्जून सातघरे यांना अटक करून २४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वर्धा शहरातील गणेशनगर येथे करण्यात आलेल्या कारवाईत शेख शकीर शेख खलिल रा. आनंद नगर याला अटक करण्यात आली. त्याच्याजवळून २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाने उपनिरीक्षक गजानन जाधव, एस. बी. मुल्ला, सहायक उपनिरीक्षक अशोक साबळे, हरिदास काकड, दिनेश तुमाने, वैभव कट्टोजवार, संतोष जयस्वाल, संजय भगत, अमरदिप पाटील, राजेश पचारे, आत्माराम भोयर, सुनिता ढाकरे यांनी केली.(प्रतिनिधी)