शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी जुमानेना,पदाधिकारी हतबल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदच्या सभागृहात गुरुवारी स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसंदर्भातील अनेक प्रश्न चर्चीले गेलेत मात्र, नेहमीप्रमाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, वन विभाग, पंतप्रधान ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी अनुपस्थित होते. यापूर्वीही सभागृहाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून अधिकारी अनुपस्थित राहत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.

ठळक मुद्देजि.प.च्या सभेला नेहमीचीच दांडी : जिल्हाधिकाऱ्यांपुढे वाचला पाढा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर चर्चा करुन त्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. त्यामुळे जिल्हा परिषदच्या पदाधिकारी, सदस्यांसह सर्व अधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहणे अनिवार्य आहे. मात्र, वारंवार सूचना देऊनही अधिकारी उपस्थित राहत नसल्याने हतबल झालेल्या पदाधिकाऱ्यांनी अखेर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची मागणी केली. तसेच पुढल्या बैठकीला अधिकारी गैरहजर राहिल्यास आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही यावेळी दिला.जिल्हा परिषदच्या सभागृहात गुरुवारी स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसंदर्भातील अनेक प्रश्न चर्चीले गेलेत मात्र, नेहमीप्रमाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, वन विभाग, पंतप्रधान ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी अनुपस्थित होते. यापूर्वीही सभागृहाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून अधिकारी अनुपस्थित राहत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीही गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीला हे अधिकारी उपस्थित झाले नाहीत. काहींना आपल्या कार्यालयाचा कर्मचारी बैठकीला पाठविल्याने प्रश्नांची उत्तरे मिळू शकली नाही.अधिकाऱ्यांचा हा मनमर्जी कारभार नेहमीचाच असल्याने या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात सर्वानुमते ठराव पारित करुन सभेनंतर सभागृहातील सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्यापुढे अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणाचा आणि मनमर्जीचा पाढाच वाचला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, सभापती माधव चंदनखेडे, विजय आगलावे, मृणाल माटे, गटनेते नितीन मडावी, संजय शिंदे, सदस्य मुकेश भिसे, मुकेश कराळे, राणा रणनवरे, पंकज सायंकार, अंकिता होले व शुभांगी हेडणे यांची उपस्थिती होती.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद