शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रवारी कोरोना रुग्ण संख्येने ओलांडली सीमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 05:00 IST

नवीन कोविड बाधितांमध्ये वर्धा तालुक्यातील १९१, हिंगणघाट तालुक्यातील २८ देवळी तालुक्यातील ४४, आर्वी तालुक्यातील ३५, आष्टी तालुक्यातील ११, कारंजा तालुक्यातील सहा, समुद्रपूर तालुक्यातील सहा तर सेलू तालुक्यातील अकरा रहिवाशांचा समावेश आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ३३२ नवीन कोविड बाधितांची भर पडल्याने जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या आता १६ हजार ३९ झाली आहे.

ठळक मुद्देएकाचा मृत्यू, जिल्ह्यात ३३२ नवे रुग्ण सापडले

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शुक्रवारी जिल्ह्यात कोरोनाने नवी उच्चांकी गाठल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात तब्बल ३३२ नवीन कोविड पॉझिटिव्ह आढळले असून यात १९२ पुरुष तर १४० महिलांचा समावेश आहे. तशी नोंदही आरोग्य विभागाने घेतली आहे. कोरोनाबाबत अजूनही वर्धेकर गंभीर नसल्याने जिल्हा प्रशासन कठोर निर्बंध लादण्याच्या मानसिकतेत असल्याचे खात्रादायक सूत्रांनी सांगितले.नवीन कोविड बाधितांमध्ये वर्धा तालुक्यातील १९१, हिंगणघाट तालुक्यातील २८ देवळी तालुक्यातील ४४, आर्वी तालुक्यातील ३५, आष्टी तालुक्यातील ११, कारंजा तालुक्यातील सहा, समुद्रपूर तालुक्यातील सहा तर सेलू तालुक्यातील अकरा रहिवाशांचा समावेश आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ३३२ नवीन कोविड बाधितांची भर पडल्याने जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या आता १६ हजार ३९ झाली आहे. तर शुक्रवारी वर्धा तालुक्यातील ७६ वर्षीय पुरुषाचा कोविड-१९ विषाणूने बळी घेतला. आतापर्यंत जिल्ह्यातील ४०१ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ५५४ ॲक्टिव्ह कोविड बाधित असून त्यापैकी अर्ध्याहून अधिक ॲक्टिव्ह कोविड बाधित सध्या गृहअलगीकरणात आहेत. तर केवळ गंभीर लक्षणे असलेले कोविडबाधित कोविड रुग्णालयात आहेत. प्रत्येक कोविड बाधिताला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी प्रत्येक व्यक्तीने सध्याच्या कोरोना संकटात दक्ष राहण्याची गरज आहे.

चार व्यक्ती देताहेत मृत्यूशी झुंजजिल्ह्यात दिवसेंदिवस नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढत असल्याने सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयातील रुग्णखाटा फुल्ल होत आहेत. ॲक्टिव्ह कोविड बाधितांपैकी सुमारे ४३० कोविड बाधित रुग्णालयात उपचार घेत असून त्यापैकी ५१ व्यक्ती आयसीयूत आहेत. तर चार व्यक्ती सध्या व्हेंटिलेटरवर असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या