एनआरसी, सीएए कायदा भारताचे तुकडे करणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 05:00 AM2020-02-18T05:00:00+5:302020-02-18T05:00:26+5:30

कायदा देशाचे तुकडे करणाराच आहे. त्यामुळे या कायद्याचा आम्ही विरोध करीत असल्याची टिका माजी पोलीस अधिकारी अब्दुल रेहमान यांनी केली. केंद्र सरकारच्या एनआरसी व सीएए या काळ्या कायद्या विरोधात दिल्ली येथे शाहीनबाग येथे आंदोलन सुरू आहे.

NRC, CAA Law Practitioner of India | एनआरसी, सीएए कायदा भारताचे तुकडे करणारा

एनआरसी, सीएए कायदा भारताचे तुकडे करणारा

Next
ठळक मुद्देअब्दुल रेहमान : वर्ध्यातील आंदोलनातून केंद्र सरकारवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा ही महात्मा गांधीजींची भूमी आहे. गांधीजींनी सत्य आणि अहिसेंची लढाई लढत देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. मात्र, आज देशात खोटे आणि हिंसा वाढत आहे. केंद्र सरकारच्या एनआरसी, सीएए आणि एनपीआर कायद्यामुळे केवळ देशातील मुस्लिमच नव्हे तर इतर समाजातही भीती निर्माण झाली आहे. हा कायदा देशाचे तुकडे करणाराच आहे. त्यामुळे या कायद्याचा आम्ही विरोध करीत असल्याची टिका माजी पोलीस अधिकारी अब्दुल रेहमान यांनी केली.
केंद्र सरकारच्या एनआरसी व सीएए या काळ्या कायद्या विरोधात दिल्ली येथे शाहीनबाग येथे आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमिवर वर्धा सेक्युलर फोरमच्यावतीने सोमवारपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर त्रि-दिवसीय धरणे आंदोलनाला आज सुरुवात झाली. यावेळी ते मार्गदर्शन करताना ते बोलत होते. देशातील बेरोजगारी, आरोग्य, महिलांवरील अत्याचार याबाबत चिंतन करून यावर काय उपाययोजना करावी, याकडे लक्ष न देता केंद्र सरकार एनपीआर आणि सीएएकडे नागरिकांचे लक्ष वेधत आहे. देशात हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई आदी विविध समाज बांधव भाईचाऱ्याने राहतात. पण, या कायद्यामुळे या समाजात तेढ निर्माण होणार आहे.
सीएए, एनआरसी कायदा देशातील ८० टक्के नागरिकांच्या विरोधात असल्याचे यावेळी रेहमान यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात चंद्रपूर येथील रमजान अली, सेक्यूर फोरमचे रिजवान पठाण, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदुरकर, शहरध्यक्ष सुधीर पांगुळ, आशिष सोनटक्के आदी सहभागी झाले होते.

Web Title: NRC, CAA Law Practitioner of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.