नऊ व्यक्तींना मॉर्निंग वॉक भोवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:00 AM2020-04-08T05:00:00+5:302020-04-08T05:00:14+5:30

देशात कोरोना विषाणूने भयावह परिस्तिथी निर्माण केली आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. २१ दिवसांचा लोकडाऊन असल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. नागरिकांनी दक्षता घेत विनाकारण घराबाहेर पडू नये असा सल्ला पोलिकांकडून वारंवार देण्यात येत आहे; पण नागरिक मात्र आदेशाचे उल्लंघन करताना दिसून येत आहे.

Nine people gathered at the Morning Walk | नऊ व्यक्तींना मॉर्निंग वॉक भोवला

नऊ व्यक्तींना मॉर्निंग वॉक भोवला

Next
ठळक मुद्देपोलिसांची कारवाई : स्वावलंबी, सर्कस मैदानावर अधिकाऱ्यांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाला हरवायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने घरातच थांबावे. अतिशय आवश्यक असल्यास तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीच नागरिकांनी नियोजित वेळत घराबाहेर जावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. परंतु, मॉर्निंग वॉकचा बहाना करून काही लोक घराबाहेर पडत असल्याची माहिती मिळाल्यावर रामनगर पोलिसांनी स्वावलंबी विद्यालय मैदान तसेच सर्कस मैदान गाठून विनाकारण घराबाहेर पडणाºया नऊ व्यक्तींना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली.
देशात कोरोना विषाणूने भयावह परिस्तिथी निर्माण केली आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. २१ दिवसांचा लोकडाऊन असल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. नागरिकांनी दक्षता घेत विनाकारण घराबाहेर पडू नये असा सल्ला पोलिकांकडून वारंवार देण्यात येत आहे; पण नागरिक मात्र आदेशाचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास रामनगरचे ठाणेदार धनाजी जळक, संदीप खरात, राहुल दूधकावडे, अजय अनंतवार यांनी स्वावलंबी आणि सर्कस मैदानावर जात मॉर्निंग वॉकचा बहाना करीत विनाकारण घराबाहेर पडलेल्या रितिक देशमुख, सुरज देशमुख, राजेंद्र चौधरी, जयंत कण्णव, राकेश ठाकरे, सुरेंद्र गोखले, नागेश तांगडे, गिरीश ताखले, उमेश रोकडे यांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध कारवाई केली.

नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर पडू नये, अशा सूचना देऊनही दुर्लक्ष करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येत आहे. नियम मोडणाºया लोकांमुळे पूर्ण समाजाला वेठीस धरू देणार नाही. प्रशासनाला सहकार्य करा अन्यथा कडक कारवाईला सामोरे जा.
- पीयूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा.

Web Title: Nine people gathered at the Morning Walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.