शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
5
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
6
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
7
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
8
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
9
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
10
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
11
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
12
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
13
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
14
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
15
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
16
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
17
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
18
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
19
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
20
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बहुऔषधीयुक्त ‘जांभुळ’ झाड होतेय दुर्मिळ

By admin | Updated: May 30, 2016 01:56 IST

बहुऔषधी गुणयुक्त १०० वर्षांपेक्षा अधिक काळ जगणारा आणि इतरांनाही शतावरी करण्यात उपयुक्त ‘जांभुळ वृक्ष’ अलिकडे दुर्मिळ होत आहे.

१०० वर्षांपेक्षा अधिक जगणारे झाड : आयुर्वेदात वृक्षाला मोठे महत्त्व
पिंपळखुटा : बहुऔषधी गुणयुक्त १०० वर्षांपेक्षा अधिक काळ जगणारा आणि इतरांनाही शतावरी करण्यात उपयुक्त ‘जांभुळ वृक्ष’ अलिकडे दुर्मिळ होत आहे. वाढती वृक्षतोड याचे प्रमुख कारण आहे. परिणामी, जांभुळ फळाचे दर्शनही दुर्मिळ होत आहे. जून महिना लागताच १०० रुपये किलो प्रमाणे ही फळे खरेदी करावी लागतात. जांभळाची फळे नव्हे तर पाने, फुले, साल, खोड आणि बियांचाही औषधी म्हणून उपयोग होतो. आयुर्वेदात या वृक्षाला मोठे महत्त्व आहे.
मे व जून महिन्याच्या कालावधीत ‘डोंगराची काळी मैना’ म्हणून जांभुळाचे आगमन होते. जांभळात लोहाचे प्रमाण अधिक असते. मधुमेहाच्या आजारात हे फळ महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याने त्या रुग्णांसाठी ही फळे वरदानच ठरली आहेत. मधुमेहासोबतच रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग, अस्थमा या आजारांतही जांभळाचे सेवन उपयुक्त ठरते. दररोज ४ ते ५ जांभळाचे सेवन केल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे शक्य होते. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासह हिरड्यांचे आरोग्य उत्तम राखण्यात जांभळे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. जांभळाची महती औषधी गुणधर्मावरच थांबत नाही तर जांभूळ हे उत्तम सौंदर्यप्रसाधक म्हणूनही काम करते. या फळापासून वाईन, व्हीनेगर, जेली, शरबत आदी तयार करण्यास अलिकडे सुरूवात झाली आहे. यातून नवीन उद्योगाची उभारणी होऊ लागली आहे. अशा उद्योगांकडून थेट जांभुळ खरेदी होत असल्याने त्याचा परिणाम खुल्या बाजारपेठेवर होऊ लागला आहे. यामुळे पूर्वी दिसणारी जांभळं आता बाजारात ठरावीक ठिकाणी दिसतात. या वृक्षाचे लाकूड टिकाऊ व पाणीरोधक असल्याने ते किमान १०० वर्षे टिकते. आता इमारती सिमेंटच्या असल्या तरी पूर्वी जांभुळ वृक्षाच्या राहत होत्या. बहुऔषधी, बहुपयोगी गुणधर्म जांळूळ झाडांसाठी अलिकडे कर्दनकाळ ठरला आहे. मानवाने निसर्गाकडून काही घेण्याच्या मोबदल्यात वृक्ष लागवड केली नाही. यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे.(वार्ताहर)

औषधी गुणधर्मच ठरला कर्दनकाळ
जांभूळ या वृक्षाचा औषधी व बहुपयोगी गुणधर्मच त्या वृक्षासाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे दिसते. लाकूड व औषधासाठी वृक्षांची कटाई होते; पण जांभूळ वृक्षांची लागवड होताना दिसत नाही. यामुळे ग्रामीण भागातूनही हे वृक्ष दिसेनासे होत असल्याचेच चित्र पाहावयास मिळत आहे.