शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

गणपती विसर्जनाकरिता गेलेला युवक बेपत्ता; शोध सुरूच

By admin | Updated: September 9, 2014 23:54 IST

नालवाडी परिसरातील बाल गणेश मंडळाच्या मूर्तीच्या विसर्जनाकरिता यमुना लॉन समोरील विहिरीजवळ गेलेला युवक बेपत्ता झाला. विहिरीत पडल्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांसह पोलिसांनी विहिरीत

वर्धा: नालवाडी परिसरातील बाल गणेश मंडळाच्या मूर्तीच्या विसर्जनाकरिता यमुना लॉन समोरील विहिरीजवळ गेलेला युवक बेपत्ता झाला. विहिरीत पडल्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांसह पोलिसांनी विहिरीत दोन दिवस शोधमोहीम राबविली; मात्र त्यांच्या हाती काहीच आले नाही. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. बेपत्ता असलेल्या या युवकाचे नाव दीपक करनाके (३०) रा. नालवाडी असे आहे. या प्रकरणाणबाबत थोक्यात वृत्त असे की, दीपक सोमवारी परिसरातील बाल गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसह विसर्जनाकरिता गेला होता. गणपती विसर्जन झाल्यावर तोही बेपत्ता असल्याचे लक्षात आले. यावरून तो विहिरीत पडल्याचा संशय बळावला. प्रकाराची माहिती शहर पोलिसांना दिली. सोमवारी दुपारपासून पोलीस व परिसरातील नागरिकांनी विविध प्रकारो विहिरीत त्याचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. मंगळवारीही त्याचा शोध घेण्यात आला. यातही अपयश आले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या सांगण्यावरून शहर ठाण्याचे निरीक्षक एम. बुराडे यांनी घटनास्थळी येवून माहिती घेतल्याचे सांगितले. परंतु शहर ठाण्यात मात्र घटनेची नोंद नाही.याबाबत अधिक विचारणा केली असता घटनास्थळ शहराच्या नाही तर सेवाग्राम पोलिसांच्या हद्दीत येत असल्याचे सांगण्यात येत आहे. सेवाग्राम पोलिसांना विचारणा केल्यास घटनास्थळ शहर ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. सदर युवकाचा शोध घेण्याची मागणी आहे.(प्रतिनिधी)