शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शिथिलता पण, प्रशासनाकडून उपाययोजना कठोरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:00 IST

शिथिलता दिल्यानंतर सर्व दुकानेही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुरु आहे. उद्योग व्यवसायलाही चालना मिळाली आहे. निमशासकीय, खासगी व शासकीय कार्यालयातही कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढविण्यात आली आहे. परिणामी रस्त्यावर किंवा बाजारपेठेत गर्दी होतांना दिसत आहे. बाहेर जिल्ह्यातून ये-जा करणाऱ्यांचेही प्रमाण वाढल्याने आता उपाययोजनांवर वॉच ठेवण्याचे निर्देश दिले आहे.

ठळक मुद्देपुन्हा दंडात्मक कारवाईला गती : गृह विलगीकरणातून बाहेर पडणाऱ्यास दहा हजाराचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात नोकरीनिमित्त, खरेदीसाठी व कामासाठी घराबाहेर पडत आहे. बाहेर जिल्ह्यातून किंवा राज्यातूनही जाणे-येणे करीत असल्याने कोविड-१९ चा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्यानमुळे प्रतिबंधक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे पुन्हा दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.शिथिलता दिल्यानंतर सर्व दुकानेही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुरु आहे. उद्योग व्यवसायलाही चालना मिळाली आहे. निमशासकीय, खासगी व शासकीय कार्यालयातही कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढविण्यात आली आहे. परिणामी रस्त्यावर किंवा बाजारपेठेत गर्दी होतांना दिसत आहे. बाहेर जिल्ह्यातून ये-जा करणाऱ्यांचेही प्रमाण वाढल्याने आता उपाययोजनांवर वॉच ठेवण्याचे निर्देश दिले आहे. यामध्ये घराबाहेर पडणाºया व्यक्तीने मास्क घालणे.दुकानांमध्ये सोशल डिस्टंन्सिंग व सॅनिटायझरचा वापर करणे. भाजी बाजारात दुकानदारांमध्ये पुरेसे अंतर ठेवणे तसेच ग्राहकांनीही सोशल डिस्टंन्सिंग व सॅनिटायझरचा वापर करणे.दुकान विहिती वेळेत उघडणे, बंद करणे तसेच दुकानात पर्याप्त सुविधा ठेवून दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे, गृह विलगीकरणातील व्यक्तीने नियमाचे पालन करुन घरातच राहणे, सक्षम अधिकाºयांची परवानगी घेऊन वाहतूक करणे, अनलोडिंग पॉइंटलाच वाहने थाबविणे व सोबतच्या व्यक्तीचा स्थानिक व्यक्तीशी संपर्क न होऊ देणे, या सूचनांचे पालन होते की नाही, याची तपासणी करुन कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कारवाईला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे....तर दुकान होणार सात दिवसासाठी सीलमास्क न लावता फिरणाºयाला दोनशे रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. दुकानात गर्दी, पर्याप्त सुविधांचा अभाव तसेच विहित वेळेनंतर दुकान उघडे ठेवले तर पहिल्यांदा दोन दिवस आणि दुसºयांदा आढळून आल्यास सात दिवस दुकानांला सील लावले जाणार आहे.गृह विलगीकरणातील व्यक्ती बाहेर आढळल्यास १० हजार रुपये दंड आकारल्या जाणार आहे. यासोबतच अवैध वाहतूक करणाºया व्यक्तीला १ हजाराचा दंड आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांचे वाहन जप्त करुन १ हजार रुपये दंड तर वाहनचालकाचा परवाना रद्द केला जाणार आहे.मास्क न वापरणाऱ्या ६० जणांवर दंडात्मक कारवाईजिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईबाबत नव्याने आदेश पारित करताच शहर पोलिसांनी गुरुवारी सकाळी कारवाईचा बडगा उगारला. निर्धारित वेळेपूर्वीच दुकान उघडणाऱ्या दहा दुकानांवर कारवाई करीत दुकाने सील केले. तसेच शहरात मास्क न लावता फिरणाऱ्या ६० जणांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात नेले. त्यांच्या नावाची नोंदणी करुन त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या