शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांना खुणावतोय बोर व्याघ्र प्रकल्प

By admin | Updated: October 18, 2014 01:49 IST

समृद्ध निसर्ग, विपुल प्रमाणात वन्यप्राणी तसेच जैवविविधतेने नटलेला मध्यभारतातील समृद्ध अशा बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी वन पर्यटनाची अपूर्व मेजवानी ठरत आहे.

वर्धा : समृद्ध निसर्ग, विपुल प्रमाणात वन्यप्राणी तसेच जैवविविधतेने नटलेला मध्यभारतातील समृद्ध अशा बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी वन पर्यटनाची अपूर्व मेजवानी ठरत आहे. बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी सुरू झाला असून, संपूर्ण भारतातील पर्यटक येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी भेट देत आहेत.बोर व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या कार्यालयात जंगल सफारीसाठी बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांना दररोज सकाळी ६ ते ११ व दुपारी २ ते ६ पर्यंत जंगल पर्यटनांचा आनंद घेणे सुलभ झाले आहे. स्थानिक बेरोजगार युवकांनी नागरिकांच्या सफारीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी खुल्या जिप्सीचीही व्यवस्था केली आहे. तसेच पर्यटन करताना व्याघ्र प्रकल्पासंबंधी माहिती देण्यासाठी गाईडची सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.बोर व्याघ्र प्रकल्प बोर नदीच्या १४० चौरस किलोमीटर अशा विस्तीर्ण परिसरात असून याच नदीवर बोर सिंचन प्रकल्पसुद्धा असल्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्याचीसुद्धा नैसर्गिकपणे उपलब्धता आहे. वाघासह बिबट, सांभर, चितळ, नीलगाय, चौसिंगा, भेकळ, अस्वल, रानमांजर, रानकुत्रे आदी प्राण्यांसह विविध प्रजातीचे पक्षी तसेच विदेशी पक्षी, विविध प्रजातीचे वृक्ष, वनस्पती आदी विपुल प्रमाणात असल्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्प मुख्य आकर्षण ठरत आहे. याच कारणाने येथे पर्यटनासाठी येत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.(शहर प्रतिनिधी)