शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये होतेय चालढकल; पॉझिटिव्हच्या संपर्कातील पाच जणांची चाचणी करण्याकडे दुर्लक्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 05:00 IST

कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हाय-रिक्स आणि लो-रिक्समधील व्यक्तीची माहिती गोळा करून वीस व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जायचे. त्या सर्वांची कोरोना चाचणी केली जायची. आता गेल्या दोन महिन्यांपासून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे आरोग्य विभागाकडून चालढकल केली जात आहे. याला काही प्रमाणात रुग्ण आणि नागरिकही जबाबदार आहेत. घरातील व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींनी स्वत:हून चाचणी करून घेणे, हे कर्तव्य आहे.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेवरील वाढतोय ताण : रुग्णांकडून असहकार्य; लपविली जात आहेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभागाकडून सुरुवातीपासून पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात केले जात होते. मात्र, दरम्यानच्या काळात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये चालढकल केली जात असल्याने रुग्णसंख्या वाढू लागली आहे.कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हाय-रिक्स आणि लो-रिक्समधील व्यक्तीची माहिती गोळा करून वीस व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जायचे. त्या सर्वांची कोरोना चाचणी केली जायची. आता गेल्या दोन महिन्यांपासून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे आरोग्य विभागाकडून चालढकल केली जात आहे. याला काही प्रमाणात रुग्ण आणि नागरिकही जबाबदार आहेत. घरातील व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींनी स्वत:हून चाचणी करून घेणे, हे कर्तव्य आहे. परंतु संपर्कातील व्यक्तीही चाचणी न करता बिनधास्त फिरत राहतो. कोरोनाबाधित रुग्णही संपर्कातील व्यक्तींची माहिती देण्यास टाळाटाळ करतो. घरातील मंडळीसुद्धा चाचणी करण्यास पुढाकार घेत नसल्याचा अनुभव आरोग्य यंत्रणेच्या पाठीशी आहेत. त्यामुळे यंत्रणेवर अवलंबून राहण्यापेक्षा नागरिकांनीही ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ओळखून काळजी घेणे गरजेचे आहे.

चाचणी वाढली की, पॉझिटिव्ह रुग्णही वाढतात

जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८५ हजार ७५५ व्यक्तींचे स्वॅब तपासणीला पाठविले असून, एक लाख ८५ हजार ७३७ अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील एक लाख ६५ हजार ४१९ अहवाल निगेटिव्ह आले असून, १८ हजार ९८२ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. आतापर्यंत १६ हजार ८७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या एक हजार ६६३ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. कोरोना चाचणी वाढविली की रुग्ण संख्येतही वाढ होत असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. ३० मार्च रोजी जिल्ह्यात १०७ चाचण्या केल्या असता २२ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या, तर ३१ मार्चला एक हजार ६७९ चाचण्यांमध्ये ३३६, तर आज १ एप्रिलला दोन हजार २२ चाचण्या केल्या असता २८५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

हा घ्या पुरावा... वर्धा शहरातील सिंदी (मेघे) परिसरातील एका युवकाला त्रास व्हायला लागल्याने त्याने सुरुवातील अ‍ॅन्टिजेन चाचणी केली असता, अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर आरटीपीसीआर चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या तो युवक गृहविलगीकरणात असून, दुसऱ्या दिवशी आरोग्य कर्मचाऱ्यांचा फोन आला व त्यांनी परिवारातील सदस्यांची माहिती घेतली. परंतु, ना परिवारातील सदस्यांची कोरोना चाचणी केली ना आजूबाजूच्या व्यक्तींची किंवा पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील माहिती घेतली गेली.वर्ध्यातील शास्त्रीनगर परिसरातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचाराकरिता सावंगीला दाखल करण्यात आले. वडील पॉझिटिव्ह आल्यानंतर परिवारातील सर्वच सदस्यांनी स्वत:हून कोरोना चाचणी केली असता मुलगाही पॉझिटिव्ह आला. आरोग्य विभागाकडून त्यांच्या घरावर स्टिकर चिपकविले; परंतु या दोघांच्याही संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली नाही. आता वडील आणि मुलगा हे दोघेही कोराेनामुक्त झाले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या