शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत ‘महिलाराज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेमध्ये ५२ सदस्य संख्या असून भाजपाकडे ३१ सदस्यांच बहूमत आहे. तर काँग्रेसकडे १३, राष्ट्रवादी काँग्रेस, बहूजन समाज पार्टी व शिवसेनेकडे प्रत्येकी दोन तर आरपीआय आणि अपक्ष प्रत्येकी एक सदस्य आहे.आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्व ५२ ही जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

ठळक मुद्देकांरजा तालुक्याला मिळाली संधी : अध्यक्ष सरिता गाखरे तर उपाध्यक्षपदी वैशाली येरावार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने पुन्हा बहूमत कायम ठेवून सत्ता कायम राखली. त्यामुळे अध्यक्षपदी कारंजा तालुक्यातील कन्नमवारग्राम सर्कलच्या सरिता विजय गाखरे तर उपाध्यक्षपदी देवळी तालुक्यातील गुंजखेडा सर्कलच्या वैशाली जयंत येरावार या विजयी झाल्या. अध्यक्षपद नामाप्र महिलाकरिता राखीव होते; पण अध्यक्ष व उपाध्यक्षपदीही महिलांचीच वर्णी लागल्याने जिल्हा परिषदेत ‘महिलाराज’ आला आहे.जिल्हा परिषदेमध्ये ५२ सदस्य संख्या असून भाजपाकडे ३१ सदस्यांच बहूमत आहे. तर काँग्रेसकडे १३, राष्ट्रवादी काँग्रेस, बहूजन समाज पार्टी व शिवसेनेकडे प्रत्येकी दोन तर आरपीआय आणि अपक्ष प्रत्येकी एक सदस्य आहे.आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्व ५२ ही जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. यावेळी भाजपकडून अध्यक्षपदाकरिता सरिता विजय गाखरे तर उपाध्यक्षपदाकरिता वैशाली जयंत येरावार यांनी तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन समाज पक्षाकडून अध्यक्षपदाकरिता तरोडा सर्कलच्या उज्ज्वला पांडुरंग देशमुख व उपाध्यक्षाकरिता सावंगी (मेघे) सर्कलचे उमेश गोपाळ जिंदे यांनी नामांकन दाखल केले होते. सभागृहात हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानात भाजपच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांना भाजपाचे ३१, आरपीआयचे १ तर शिवसेनेचे दोन अशी ३४ मते पडली. तर विरोधी पक्षाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांना केवळ १८ मतांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे भाजपाच्या सरिता गाखरे यांची अध्यक्षपदी आणि वैशाली येरावार यांची उपाध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आले. निवडणुकीनंतर सभागृहातील सदस्यांनी टेबल वाजवून त्यांचे अभिनंदन केले. या निवडणूक प्रक्रियेत अध्यासी अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांच्यासह निवडणूूक विभागाचे मिलिंद जोशी, तहसीलदार प्रीती डुडुलकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव आदींची उपस्थिती होती. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून सत्ताधारी व विरोधी गटाच्या सदस्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. शिवाय निकालानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला.अतिउत्साह; कार्यकर्त्यांकडून शांतता भंग४आज निवडणुकीकरिता सर्व सदस्य सभागृहात दाखल झाल्यावर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. मिनिमंत्रालय असल्याने या परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे भान भाजपच्या काही अतिउत्साही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना राहिले नाही. प्रक्रि या पूर्ण होण्यापूर्वीच वऱ्हाड्यात फटाके उडवायला सुरुवात केली. यावरच ते थांबले नाही तर ढोल-ताशाही सुरु केला. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत व्यत्यय आल्याने सूचनेवरून ढोल-ताशांचा आवाज बंद करण्यात आला. या फटक्यांमुळे मोठ्या प्रमाणात कचरा व धुरळा उडाला होता.पहिल्यांदाच मान४कारंजा तालुक्यात भोयर-पवार समाजाची संख्या मोठी आहे. सुरुवातीपासूनच आर्वी विधानसभा क्षेत्रातील कारंजा तालुक्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळावे, अशी मागणी होती. अखेर आमदार दादाराव केचे यांनी कारंजा तालुक्याची मागणी पूर्ण करण्यासाठी ताक द लावून भोयर-पवार समाजाच्या सरिता विजय गाखरे यांना अध्यक्षपदी विराजमान केले. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच या समाजाला मान मिळाने जल्लोष केला.विद्यमान पदाधिकाऱ्यांना सोपविला पदभारनवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीनंतर मावळते जि.प.अध्यक्ष नितीन मडावी यांनी विद्यमान अध्यक्ष सरिता गाखरे यांच्याकडे पदभार सोपविला. तर मावळत्या उपाध्यक्ष कांचन नांदूरकर यांनी विद्यमान उपाध्यक्ष वैशाली येरावार यांच्याकडे जबाबदारी सोपविली. यावेळी खा.रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ.समीर कुणावार, आ.दादाराव केचे, माजी खा. विजय मुडे, सुधीर दिवे, भाजपचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा अर्चना वानखेडे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, प्रशांत इंगळे तिगावकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्याम कार्लेकर यांची उपस्थिती होती.

टॅग्स :zpजिल्हा परिषद