शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘एम किसान’ महिन्यापासून बंद

By admin | Updated: September 12, 2015 01:58 IST

शेतकऱ्यांना पिकाच्या नियोजनासह कीड व्यवस्थापन व शासनाच्या योजनांची माहिती देण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने ‘एम किसान’ ही एसएमएस योजना अंमलात आणली.

रूपेश खैरी वर्धाशेतकऱ्यांना पिकाच्या नियोजनासह कीड व्यवस्थापन व शासनाच्या योजनांची माहिती देण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने ‘एम किसान’ ही एसएमएस योजना अंमलात आणली. ती काही दिवस सुखरूप सुरू राहिली; मात्र गत महिन्यापासून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकही एसएमएस गेला नाही. या यंत्रणेमुळे शासनावर अतिरिक्त आर्थिक भार येत असल्यामुळे ही योजना थेट दिल्ली येथून बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या शेतात पीकं बहरली आहेत. अशात निसर्गाचा लहरीपणा नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या आड येत आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडीचा हल्ला होत आहे. याची कृषी विभागाच्यावतीने पाहणी करण्यात येत आहे. यावरील उपाययोजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता असलेली ही ‘एम किसान’ योजना बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या नव्या रोगांची व पिकांवर आलेल्या सध्याच्या किडवर कसे नियंत्रण मिळवावे याची माहिती मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. सध्याच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी सोडविण्याकरिता या एम किसानची गरज भासत आहे. ऐन गरजेच्यावेळी शासनाची ही यंत्रणा शेतकऱ्यांकरिता कुचकामी ठरत आहे. ही योजना केवळ एका वर्धा जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. ही योजना राबविताना शासनावर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड येत असल्याने ही योजना सध्या बंद असल्याचे पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयातून कळविले असल्याचे वर्धा कृषी कार्यालयातून सांगण्यात आले आहे. या योजनेकरिता आणखी किती निधी लागणार यावर होणाऱ्या चर्चेअंती ही योजना राबवावयाची अथवा नाही यावर निर्णय होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांकरिता असलेला ‘एम किसान’ येत्या काळात सुरू राहील अथवा नाही या बाबत शंका निर्माण झाली आहे.