शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्याचा भगवान ठरला ‘स्वरांजली’चा मानकरी

By admin | Updated: January 9, 2016 02:37 IST

स्थानिक विद्या विकास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने प्रा. अभय बावणे यांच्या स्मृतीत ‘स्वरांजली’ ही विदर्भस्तरीय गीतगायन स्पर्धा घेण्यात आली.

समुद्रपूर : स्थानिक विद्या विकास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने प्रा. अभय बावणे यांच्या स्मृतीत ‘स्वरांजली’ ही विदर्भस्तरीय गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील अंध गायक कलाकार भगवान बाभुळकर हा प्रथम पुरस्काराचा मानकरी ठरला. तसेच नागपूरचा श्याम शिंदे हा द्वितीय तर व वर्धेची अस्मिता काणे ही तृतीय पुरस्काराची मानकरी ठरली. चतुर्थ पुरस्कार प्रवीण पेटकर याला देण्यात आला. सदर स्पर्धेत विदर्भातील ९० गायक कलाकारांनी सहभाग घेतला होता. प्रथम निवड फेरीतून अंतिम फेरीकरिता १२ स्पर्धकांची निवड करण्यात आली. या सर्व स्पर्धकांना मान्यवरांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार समीर कुणावार होते. व्यासपीठावर संस्थाध्यक्ष पांडुरंग तुळसकर, धनराज गोल्हर, किशोर दिघे, डॉ. उमेश तुळसकर, गजानन देशमुख, प्राचार्य रमेश बोभाटे, डॉ. निलेश तुळसकर, शांतीलाल गांधी, शाकीरखान पठाण, उपप्राचार्य डॉ. राजविलास कारमोरे, स्पर्धा संयोजक प्रा. किरण वैद्य व प्रा. विलास बैलमारे यांची उपस्थिती होती.स्पर्धेचे उद्घाटन संस्था सचिव डॉ. प्रा. उमेश तुळसकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष शीला सोनारे, आरोग्य सभापती गजानन राऊत, राष्ट्रपाल कांबळे, प्रभाकर उगेमुगे, भारत सामतानी, मनीष गांधी, प्रफुल क्षीरसागर यांची उपस्थिती होती. एकाहून एक सरस गाणी यावेळी सादर करण्यात आली. त्यामुळे स्पर्धेबरोबरच श्रोत्यांना सुमधून अश्या बहारदार गीतांची मेजवानी मिळाली. प्रास्ताविक प्रा. मेघश्याम ठाकरे यांनी केले. संचालन प्रा. मंगला खुणे व नितीन आखुज यांनी केले. उपस्थितांचे आभार राजकुमार रामटेके यांनी मानले. यशस्वीतेकरिता प्रा. मनोज कोरेकर, डॉ. राजीव कळसकर, प्रा. दशरथ महाकाळे, प्रा. विजय वानखेडे, चंद्रकांत सातपुते, डॉ. संजीव कटारे, अशोक झाडे, नितीन डगवार, प्रा. अजय मोहोड, प्रा. रत्नाकर भास्कर, प्रा. घनश्याम कदमधाड, प्रा. महेश चिव्हाणे, प्रा. रमेश निखाडे, डॉ. विना नागपूरे, डॉ. नयना शिरभाते, प्रा. आफरीश अली, डॉ. भीमशंकर नगराळे, शोभा बांगडे आदींनी सहकार्य केले.जयंत भिरंगे, प्रा. झाडे, वासुदेव गोंधळे, प्रा. माहूरकर यांनी परीक्षकांनी भूमिका पार पाडली. नागरिकांनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)