शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेल्या चितळाला जीवदान

By admin | Updated: April 20, 2016 02:20 IST

वाढत्या उन्हामुळे जंगलातील पाणवठे आटत आहेत. यामुळे वन्यप्राणी पाण्यासाठी गावाकडे धाव घेत आहे.

पिपल फॉर अ‍ॅनिमल्स व वनविभागाकडून संयुक्त प्रयत्नवर्धा : वाढत्या उन्हामुळे जंगलातील पाणवठे आटत आहेत. यामुळे वन्यप्राणी पाण्यासाठी गावाकडे धाव घेत आहे. यातच आर्वी तालुक्यातील दहेगाव (मुस्तफा) येथील एका शेतातील विहिरीत चितळ पडल्याची माहिती ग्रामस्थांनी येथील पिपल फॉर अ‍ॅनिमल्सला दिली. त्यांनी वन विभागाच्या साह्याने ते चितळ बाहेर काढून त्याला जीवनदान दिले. पाण्याच्या शोधात गावाकडे आलेले चितळ विहिरीत पडल्याची माहिती नागरिकांनी येथील पिपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या मनीष ठाकरे यांना दिली. ठाकरे यांनी त्वरित वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क केला व घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले; पण चितळाचे वजन ८० ते ९० किलो असल्याने त्याला विहिरीतून बाहेर काढणे सहज शक्य नव्हते. अखेर वर्धेवरून मदत मागवून या चितळाला बाहेर काढण्यात आले. यासाठी पिपल फॉर अ‍ॅनिमल्सचे वर्धा येथील कौस्तुभ गावंडे, सूरज सिंग यांच्यासह आर्वी वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक बनसोड, बिट गार्ड इंगळे, तांबेकर, तंबाके, पिपल फॉर अ‍ॅनिमल्सचे उमेश धुमडे, प्रमोद उदासे, मंगेश येनोरकर व दहेगाव (मुस्ताफा) येथील ग्रामस्थांनीही चितळाला विहिरीतून बाहेर काढण्यास मोठी मदत केली. चितळाला बाहेर काढल्यानंतर त्याला काही गंभीर जखमा झाल्याचे दिसून आले. यामुळे त्याला औषधोपचाराकरिता वर्धेतील करुणाश्रमात आणण्यात आले. तेथे पिपल फॉर अ‍ॅनिमल्सचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप जोगे चितळावर उपचार करीत आहे. सचिव आशिष गोस्वामी यांच्या मार्गदर्शनात मुकेश नेहारे व गणेश मसराम चितळाची विशेष काळजी घेत आहे. वन विभागाच्या आदेशानंतर चितळाला जंगलात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)