शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जखाळा शिवारात बिबट्याचा वावर

By admin | Updated: May 15, 2014 01:47 IST

पाण्याच्या शोधात उन्हाळ्यात वन्यप्राणी गाव शिवारांकडे कुच करतात. सध्या जखाळा शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे.

ग्रामस्थांत भीती : पायाचे ठसे आढळलेघोराड : पाण्याच्या शोधात उन्हाळ्यात वन्यप्राणी गाव शिवारांकडे कुच करतात. सध्या जखाळा शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. यामुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.जखाळा मौजा हा बारमाही ओलिताची शेती असणारा व केळीच्या बागांचा भाग समजला जातो. या मौज्यापासून जंगल दूर असले तरी येथे थंडावा कायम असतो. दोन दिवसांपूर्वी एका शेळीला ठार मारण्याचा प्रकार येथे घडला. या घटनेचा मागोवा घेण्यात आला असता काही प्राण्यांच्या पायाचे ठसे आढळून आले. या शिवारात वन्यजीव प्रेमी घनश्याम माहुरे यांचे शेत आहे. त्यांनी ठशांचे अवलोकन केले असता सदर ठसे बिबटाच्या पायाचे असल्याचे निष्पन्न झाले.मागील वर्षीही उन्हाळ्यात याच मौजात सातबहिणीचा नाला या भागात बिबट्याचा वावर होता. त्यावेळीही एका शेतकर्‍याच्या गायीचा फडशा पाडला होता. दरवर्षी उन्हाळ्याच्या तप्त वातावरणापासून बचाव करण्याकरिता व पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावशिवाराकडे येत असल्याचा अनुभव ग्रामस्थांना आहे. सध्या बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आल्याने शेतकरी धास्तावले आहे. वनिभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या परिसरातील शेतकर्‍यांत भीतीचे वातावरण आहे.(वार्ताहर)

■ जखाळा शिवारामध्ये दोन दिवसांपूर्वीएका बकरीचा फडशा पाडला. घटनास्थळावर आढळलेले पायाचे ठसे बिबट्याचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.■ परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे कळताच शेतकर्‍यांमध्ये भीती पसरली.