शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मतदार स्वस्थ तर नेते अस्वस्थ

By admin | Updated: September 9, 2014 23:55 IST

स्वातंत्र्यानंतरच्या सहा दशकांत काही अपवाद वगळता पुलगाव-देवळी विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्लाच राहिला आहे. अत्यंत संवेदनशील असणाऱ्या या मतदार संघात मागील कित्येक वर्षांत

प्रभाकर शहाकार - पुलगावस्वातंत्र्यानंतरच्या सहा दशकांत काही अपवाद वगळता पुलगाव-देवळी विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्लाच राहिला आहे. अत्यंत संवेदनशील असणाऱ्या या मतदार संघात मागील कित्येक वर्षांत काँग्रेसकडून देण्यात आलेल्या उमेदवारांना मतदारांनी डोक्यावर घेतले; पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोदी लाटेमुळे काँग्रेसचे पानिपत झाले. या लाटेत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारले. यामुळे काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले असले तरी मतदार मात्र स्वस्थ असून आगामी निवडणुकीची प्रतिक्षा करीत असल्याचेच दिसते.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा काँग्रेसपेक्षा ३ हजार ७४६ मतांनी मागे होती; पण एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देवळी विधानसभा मतदार संघातून भाजपाला ८१ हजार ८२२ मते मिळाली, तेथे काँगे्रसला ५१ हजार २९६ मतेच मिळालीत. या निवडणुकीत काँगे्रसच्या मतांमध्ये ३० हजार ५२६ मतांचा खड्डा पडला. विद्यमान परिस्थिती पाहता या मतदार संघातील अनेक ग्रामपंचायती काँग्रेसच्या हातून निसटल्या आहेत. रोहणी गावालगतच्या भिडी, विजयगोपाल व इंझाळा यासारखी मोठी गावे हातातून सुटल्यामुळे भाजपाची सत्ता स्थापित झाली.मतदार संघातील देवळी व पुलगाव नगर परिषदेपैकी देवळी नगर परिषदेत भाजपाची सत्ता आहे तर अपक्षांच्या सहकार्याने पुलगाव नगर परिषदेवर सत्ता राखण्यात काँगे्रसला यश आले आहे. असे असले तरी नगरसेवकांची कुरघोडी सुरूच आहे. यातच काँगे्रसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे भाजपावासी झाल्याने त्यांचे कित्येक कार्यकर्ते भाजपामध्ये सामील झाल्याने काँगे्रसला मोठा धक्का बसण्याची शक्यता मतदार संघात वर्तविली जात आहे. अद्याप विधानसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा झालेली नाही. असे असले तरी काँग्रेस व भाजपा या दोन्ही प्रबळ राजकीय पक्षांनी आपली मक्तेदारी सांगून या मतदार संघात प्रचाराचे रणशिंग फुंकल्याचेही दिसून येते. तालुक्यात रस्ते, नाल्या, समाज मंदिरे, खर्डा बॅरेज, पुलगाव बॅरेज, ग्रामपंचायत भवन, दवाखाने, लोअर वर्धा प्रकल्प या माध्यमातून विकास कामांचा धडाका सुरू करून एकप्रकारे निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याचे चित्र आहे.देवळी-पुलगाव मतदार संघामध्ये एकूण २ लाख ४२ हजार ९१७ मतदार आहेत. २००९ च्या तुलनेत १७ हजार ८७७ नवीन मतदारांची यात भर पडलेली आहे. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला ५८ हजार ५७५ मते तर भाजपाला ५० हजार ८२९ मते मिळाली होती. यातच पुलगाव, देवळी, नाचगणाव, गुंजखेडा या मोठ्या गावांमध्ये काँग्रेसची जवळपास ८ हजार मतांनी पिछेहाट झाल्याचे दिसून येते. मतदार संघाचा आढावा पाहता या मतदार संघात बेरोजगारी, शेतकरी, शेतमजुरीचे प्रश्न, औद्योगिक वसाहत आदी महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे रस्ते, नाल्या, पूल या बांधकामांमुळे ग्रामीण भागाचे प्रश्न सुटत नसल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केल्या जात असल्याचेही दिसून येते.