शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक विवंचनेत झाले शेतकऱ्यांचे लक्ष्मीपूजन

By admin | Updated: October 25, 2014 01:40 IST

सोयाबीनचा दाणा घरी नाही, कापसाचे आगमन झाले नाही, अशातच आलेल्या सणाला शेतकरी सामोरे गेले.

घोराड : सोयाबीनचा दाणा घरी नाही, कापसाचे आगमन झाले नाही, अशातच आलेल्या सणाला शेतकरी सामोरे गेले. या दिवसाला आनंद साजरा करण्यात आला नसला भाऊबिजेला बहीन घरी येणार याचा आनंद भावाला आहे. बहीन घरी आल्यावरच भाऊबीजेनंतर दिवाळी साजरी साजरी करू अशी अशा शेतकरीर ठवून आहे. या दिवसापर्यंत शेतातील काही उत्पन्न घरी येईल, ते बाजाराज काढून दिवाळी साजरी करण्याची भाषा बळीराजा बोलत आहे. लक्ष्मीपुजनाला केवळ नैवैद्यासाठी सण साजरा करण्यात आला़ लांबलचक अंगणात व दाराच्या दोन्ही बाजूला लावल्या जाणाऱ्या दिव्यांची आरास यंदाच्या दिवाळीत तेलात कापसाची वात भिजवून नावापुरता प्रकाश जरी दिसला तरी प्रकाशाचे पर्व साजरे झाल्याचा आनंद साऱ्यांनी घेतला़ पण विवंचना कायम होती़ दिवाळी हा आर्थिक उलाढालाची सण. शेतकरी दरवर्षी पांढऱ्या सोन्याच्या भरवशावर हा सण साजरा करतो. पण उशिरा झालेल्या दुबार तिबार पेरणीमुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात शितदहीच्या कापूस वेचणीला प्रारंभ झाला नाही़ सततच्या नापिकीत दसरा झाला, धनत्रोयदशीला सोने खरेदी करतात एक तरी सोन्याचा मणी घ्यावा ही आशा तर पूर्ण झालीच नाही, उलट सुवर्ण तारण घेवून बहुतांश शेतकऱ्यांना दिवाळी सणाला सामोरे जावे लागते आहे़ भाऊबीजेपासून आर्थिक उलाढालीला वेग येतो़ दिवाळी दिवाळ काढणारी आहे, असे बोलले जात असले तरी भाऊबीज हा दिवाळीतील सर्वसामान्यापासून ते श्रीमंतापर्यंत आपापल्यापरीने खर्च करणारा सण आहे़या दिवसापासून बाजारपेठेत गर्दीला सुरुवात होते़ कापड व स्टील भांड्याच्या दुकानात आर्थिक व्यवहाराला चालना मिळत असताना किराणादुकान मधून मालाची उचल होते़ बहीण, जावई, भाचा, भाची यासमवेत होणारा हा सण पाहुणचारासहित देवाण घेवाणीचा असतो़ शेतकऱ्यांनी उचलेले बँकेचे कर्ज नापिकीमुळे कसे चुकवावे या विवंचनेत असलेले शेतकरी आता दिवाळी सणाला सामोरे गेले असून यावर्षीची भाऊबीज आणि बहीण एकमेकांचा आर्थिक बाजू समजावून घेवून साजरी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे़ यातही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट येथे कायम राहणार असल्याची भीती आहे. (वार्ताहर)