शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा तालुक्यात कुष्ठरोग रूग्ण शोध मोहिमेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 01:19 IST

केंद्र शासनाद्वारे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत तालुक्यात कुष्ठरोग रूग्ण शोध मोहिमेचा शुभारंभ करण्यात झाला.

९७ आशा शोधणार ९७ गावात कुष्ठरुग्णकारंजा : केंद्र शासनाद्वारे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत तालुक्यात कुष्ठरोग रूग्ण शोध मोहिमेचा शुभारंभ करण्यात झाला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पडवे यांच्या हस्ते मोहिमेस प्रारंभ झाला.तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, सारवाडी व कन्नमवार अंतर्गत ९७ गावांमध्ये ९२ हजार पेक्षा जास्त लोकसंख्येची कुष्ठरोग दृष्टीकोणातून पाहणी करण्यात येणार आहे. १९ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत ९७ आशा स्वयंसेविका व त्याच गावांतील तेवढेच पुरूष स्वयंसेवक प्रत्यक्ष गृहभेटीतून प्रत्येक कुटुंबातील एका एका सदस्याची तपासणी करणार आहेत. \फ्लॅशकार्ड द्वारे कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे शोधली जाणार आहेत. नवीन संशयीत कुष्ठरूग्णाचे निदान करून त्यांना त्वरित मोफत औषधोपचार देण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण रूग्णालय, कारंजा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुमित अंबादे, प्रा.आ. केंद्र सारवाडीचे वद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. पाटेकर, डॉ. एम.के. चापे, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहायक, पर्यवेक्षक व अधिकारी प्रयत्नशील आहेत. कारंजाचे गट विकास अधिकारी, बी. डब्ल्यू. यावले यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कुष्ठरोग सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. यात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पडवे, सचिव गट शिक्षण अधिकारी बी.टी. बोळणे एकात्मिक बाल विकास अधिकारी आशा माहाडिक, पं. स सदस्य किशोर उकंडे आणि गुरूदेव सेवा मंडळाचे गोपाळ विरूळकर यांचा समावेश आहे.सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी समाजातील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले व डॉ. मंगेश रेवतकर, डॉ. लक्षदीप पारेकर प्रयत्नशील आहेत.(तालुका प्रतिनिधी)