शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त

By admin | Updated: September 30, 2014 23:40 IST

काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना ओलीत करणे गरजेचे झाले आहे. पीक वाचविण्याच्या धडपडीत असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे.

घोराड : काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना ओलीत करणे गरजेचे झाले आहे. पीक वाचविण्याच्या धडपडीत असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे. सततच्या या त्रासाने शेतकरी मेटाकुटीस आले आहे. वीज वितरणचे कर्मचारी तक्रारीकडे डोळेझाक करीत असल्याच्या प्रत्यय येथील शेतकऱ्यांना येत आहे. या क्षेत्रात कर्मचाऱ्यांकडे काम अधिक आणि कर्मचारी कमी अशी अवस्था आहे. यामुळे कृषीपंपाच्या तक्रारीचे निरसन तातडीने होत नाही. तक्रार निकाली काढण्याकरिता किमान दोन दिवस शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. हे चित्र तालुक्यातील प्रत्येक गावात पाहायला मिळत आहे. हिंगणी मौज्यातील रोहित्रावर केळझर फिडरवरून पुरवठा केला जातो. जवळपास १७ कि.मी अंतरावर हे फिडर असून ते वारंवार बंद असते. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार या समस्येचा सामना करावा लागतो. घोराड येथील शेतकऱ्यांना तांत्रिक बिघाड आल्यास कोलगावच्या लाईनमनला संपर्क साधावा लागतो. विद्युत पुरवठा वारंवार बंद राहत असल्याने पिकांचे ओलित होत नसल्याने आर्थिक भुर्दंड तर पडतोच पण मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. ही समस्या निकाली काढण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष देऊन कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)