शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
3
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
4
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
5
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
6
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
7
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
8
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
9
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
10
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
11
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
12
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
13
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
14
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
15
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
16
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
17
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
18
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
19
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
20
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
Daily Top 2Weekly Top 5

सभापतिपदी खडसे, तर उपसभापतिपदी कामनापुरे

By admin | Updated: August 7, 2015 01:57 IST

पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक अविरोध झाली.

पुलगाव बाजार समितीवर काँग्रेस-राकाँचा झेंडादेवळी : पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक अविरोध झाली. बाजार समितीची निवडणूक भारतीय काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे व राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या गटाने युती करून लढविली. यामुळे ठरलेल्याप्रमाणे आ. कांबळे यांच्या गटाला सभापतिपद व राष्ट्रवादीचे प्रा. देशमुख यांच्या गटाला उपसभापतिपद देण्यात आले. बाजार समितीच्या सभापती पदासाठी काँग्रेसचे मनोहर खडसे यांची अविरोध निवड करण्यात आली. या पदासाठी त्यांचे नाव बाजार समितीचे संचालक अमोल कसनारे यांनी सूचविले तर त्याला अयुबअली पटेल यांनी अनुमोदन दिले. उपसभापती पदासाठी सर्वाधिक २६१ मताधिक्याने निवडून आलेले राष्ट्रवादीचे संजय कामनापूरे यांची अविरोध निवड झाली. राजा खेडकर यांनी त्यांचे नाव सुचवून प्रवीण ढांगे यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका उपनिबंधक एस.पी. गुधाणे व सहाय्यक म्हणून एस. डब्ल्यू. कोपुलवार यांनी काम पाहिले. याप्रसंगी माजी आमदार देशमुख, पं.स. सभापती भगवान भरणे, उपसभापती गुलाब डफरे, जि.प.सदस्य मोहन शिदोडकर व मोरेश्वर खोडके, पंचायत समितीचे माजी सभापती मनोज वसू, दिनेश धांदे, सुनील बासू, सुतगिरणीचे संचालक सुरेश डफरे, माजी जि.प.सभापती अशोक इंगोले, विश्वास येंडे व बाजार समितीचे संचालक मंडळ उपस्थित होती.(प्रतिनिधी)