शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कृती आराखडा अद्ययावत ठेवा

By admin | Updated: May 24, 2015 02:33 IST

जिल्ह्यातील गावामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यास सर्वोतोपरी पूर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करून अंमलबजावणीस सुरुवात करा.

वर्धा : जिल्ह्यातील गावामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यास सर्वोतोपरी पूर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करून अंमलबजावणीस सुरुवात करा. अद्ययावत पद्धतशीर प्रक्रिया (एसओपीएस), नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा अद्ययावत ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मान्सून पूर्व आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, पोलीस उपअधीक्षक आर. जी. किल्लेकर, उपविभागीय अधिकारी घनश्याम भूगावकर, स्मिता पाटील, तहसीलदार अजय झिले, सुभाष यादव, गजेंद्र बालपांडे, बी.आर. तीनघसे, मुख्याधिकारी मनोज शहा, अनिल जगताप, एच. डी. टाकरखेडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता टी. एस. शेतवार, बीएसएनएलचे आर.पी. साठोणे आदींची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी भागवत म्हणाले, आपत्तीतील बाधितांचा पंचनामा करताना प्रत्येक बाधिताचा खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक याची नोंद घ्यावी. अतिवृष्टी, पूरपरिस्थितीची संभाव्य गावांची संपर्क यादी अद्ययावत ठेवावी. सर्व लाईट, जॅकेट, बोट, औषधी, अन्नसाठा, ब्लिचिंंग पावडर आदी साहित्य व्यवस्थित ठेवून त्याचे योग्य व्यवस्थापन करावे. तालुका पातळीवर समित्या स्थापन करून आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी अत्यंत कटाक्षाने पार पाडावी. सर्व यंत्रणांनी संपर्क क्रमांक अद्ययावत करुन नियत्रंण कक्षाकडे सोपवावित आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तालुकास्तरावरील संबंधित यत्रंणांनी अद्ययावत पद्धतशीर प्रक्रिया (एसओपीएस), आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा संदर्भातील माहिती संबंधित संकेतस्थळावरही पाठवावी, अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी करुन मान्सून पूर्व तयारी गतीने करावी, आरोग्य, पुरवठा, नगर परिषद, महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, दूरसंचार, वीज, एसटी, पाणी पुरवठा विभागाने बारकाईने नियोजन करुन नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा सादर करुन सादर करावा. असेही सांगितले.(शहर प्रतिनिधी)