शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
3
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
4
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
5
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
6
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
7
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
8
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
9
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
10
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
11
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
12
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
13
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
14
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
15
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
16
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
17
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
18
८ महिन्याची गर्भवती, घरोघरी जात केला प्रचार; चक्कर येऊन पडली तरी हिंमत हरली नाही; आज बनली आमदार
19
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
20
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणी लोणकर वाणिज्य शाखेतून जिल्ह्यात प्रथम

By admin | Updated: May 26, 2016 00:23 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने बारावीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला.

जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचे तालुकानिहाय निकालवर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने बारावीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात जिल्ह्यात यंदा मुलींनीच बाजी मारली. पहिल्या चारही क्रमांकावर मुलीच असून एकाही मुलाचा त्यात समावेश नाही. यातील गो. से. वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी कल्याणी ज्ञानेश्वर लोणकर हिने ९३.८५ टक्के गुण प्राप्त केले. जिल्ह्यात तिसरी आणि वाणिज्य शाखेत ती जिल्ह्यातून प्रथम आली आहे. जिल्ह्यात प्रथम चारही क्रमांकांवर मुलींचीच सरशी आहे. विज्ञान शाखेची स्वराली घोडखांदे ही जिल्ह्यात अव्वल, तर गांधीग्राम कनिष्ठ महाविद्यालयाची प्रियाली गाठे ही दुसऱ्या क्रमांकावर आणि गो.से. वाणिज्य महाविद्यालयाची कल्याणी लोणकर तिसऱ्या, तर चतुर्थ स्थानावर न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान शाखेची उर्जिता दीपक चौधरी ही आहे. जिल्ह्यात आष्टी तालुक्याचा निकाल सर्वाधिक ८९.५६ टक्के इतका लागला आहे.स्वराली होणार वैज्ञानिक-न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी स्वराली विलास घोडखांदे हिने ९६ टक्के गुण प्राप्त करीत जिल्ह्यात आणि मुलींतूनही प्रथम येण्याचा मान मिळविला. तिला भविष्यात काय व्हायचे आहे, याबाबत विचारले असता वैज्ञानिक होणार असल्याचे ती स्वयंस्फूर्तपणे म्हणाली. ही केवळ तिची इच्छाच नव्हती तर यासाठी तिने प्रयत्नही सुरू केले आहेत.-गत दोन वर्षांपासून स्वराली हैद्राबाद येथे आयआयटीचे प्रशिक्षण घेत असून तिने बारावीच्या अभ्यास केलाच नाही. केवळ आयआयटीचा अभ्यासक्रम बारावीशी मिळताजुळता; पण कठीण असतो, असे ती म्हणाली. परीक्षेच्या एक महिन्यापूर्वीपर्यंत ती हैदराबाद येथेच होती. केवळ बारावीच्या परीक्षेसाठी आल्यानंतर ती पुन्हा तेथील आयआयटी जेईई अ‍ॅडव्हांस ही परीक्षा देण्याकरिता हैदराबाद येथे परत गेली. कठोर मेहनत घेतल्यास यश नक्कीच असते, असेही ती म्हणाली. - स्वरालीचे वडील विलास घोडखांदे हे सेलूकाटे येथील जि.प. शाळेत तर तिची आई प्रशंसा या बांगडे विद्यालय पवनार येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.