शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षाच्या आरक्षणाने ‘कही खुशी कही गम’

By admin | Updated: October 6, 2016 00:34 IST

जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत मुंबई येथे काढण्यात आली.

वर्धा-हिंगणघाट सर्वसाधारण, पुलगाव सर्वसाधारण महिला, देवळी अनु. जमाती, आर्वी नामाप्र व सिंदी (रेल्वे) अनु. जाती महिलावर्धा : जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत मुंबई येथे काढण्यात आली. या आरक्षणाची वार्ता जिल्ह्यात धडकताच ‘कुठे खुशी तर कुठे गम’चे वातावरण बघायला मिळाले. मुंबईत जाहीर झालेल्या आरक्षणात वर्धा व हिंगणघाट सर्वसाधारण, पुलगाव सर्वसाधारण महिला, देवळी अनुसूचित जमाती, आर्वी नागरिकांचा मागास प्रवर्ग व सिंदी (रेल्वे) येथील नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलांकरिता राखीव झाल्याची माहिती जिल्ह्यात मुंबई येथे गेलेल्या काहींनी पुरविली. या माहितीला शासकीय स्तरावर दुजोरा मिळाला नसल्याने यावर शिक्कामोर्तब होवू शकले नाही. यामुळे नगराध्यक्षपदाची स्वप्न बाळगणाऱ्यांची हुरहूर सायंकाळपर्यंत कायम असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात येत्या वर्षात पालिकेची निवडणूक होणार आहे. यात नव्या प्रभाग रचेनुसार सदस्यांचे आरक्षण जाहीर झाले. नगराध्यक्ष जनतेतून निवडणूण द्यावयाचा असल्यानें या पंचवार्षिकेकरिता अनेकांनी इच्छा बाळगल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. यामुळे जिल्ह्यातील वर्धा, आर्वी, देवळी, पुलगाव, सिंदी (रेल्वे) व हिंगणघाट येथील नागरिकांचे या आरक्षणाकडे लक्ष लागले होते. त्यांची उत्सकूता शिगेला असताना मुंबई येथे आरक्षणाची सोडत झाली. यात इच्छुकांनी आपापल्या परीने आरक्षणाची दिलेली माहिती जिल्हाभर फिरत होती. जिल्ह्यात पोहोचलेल्या माहितीनुसार, वर्धा व हिंगणघाट नगर परिषद सर्वसाधारण प्रवर्गाकरिता राखीव असल्याचे समोर आले. जिल्ह्यात मोठ्या असलेल्या या दोनही नगरपरिषदेच्या या आरक्षणामुळे येथील इच्छुकांना कुठलाही अडसर राहिला नाही. तर आर्वी नगर परिषद नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता राखीव झाला आहे. यामुळे येथे काहींच्या इच्छेवर पाणी फेरल्याची चर्चा आहे. सिंदी (रेल्वे) नगर परिषदेचे आरक्षण अनुसूचित जाती महिलेकरिता राखीव झाल्याने येथे येत्या पंचवार्षिकेत पुन्हा नगराध्यक्षपदी महिलाच विराजमान होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पुलगावचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेकरिता राखीव झाले आहे. यामुळे सध्या चर्चेत असलेल्या या नगरपरिषदेतील अनेकांच्या आशा मावळल्याचे दिसून आले. या पालिकेतील अनेक दिग्गजांच्या आशांवर पाणी फेरल्या गेल्याचे दिसून आले आहे. देवळी येथील नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीकरिता राखीव झाल्याने येथेही अनेकांच्या आशा मावळल्याचे चित्र दिसून आहे. आजच्या या आरक्षणामुळे जिल्ह्यात निवडणुकीचा रंग चढण्यास प्रारंभ झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आरक्षण जाहीर होताच राजकीय पक्षांकडून उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)