शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या सात तासांत १६ हजार ९५५ व्यक्तींनी घेतली कोविड लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 05:00 IST

शनिवारी एकूण ९१ केंद्रांवरून लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. सकाळी ९ वाजतापासून प्रत्येक केंद्रावरून लस देण्यास सुरूवात झाली. सकाळपासूनच लस घेणाऱ्यांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती. शनिवारी दुपारी ५ पर्यंत लाभार्थ्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली असली तरी दुपारी ४ वाजेपर्यंत ९१ केंद्रांवरून तब्बल १६ हजार ९५५ व्यक्तींनी लस घेतल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.

ठळक मुद्देविक्रमी लसीकरण करुन आरोग्य विभागाने सिद्ध केली क्षमता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सोमवारी एकाच दिवशी १३ हजार ३८९ व्यक्तींना कोविड व्हॅक्सिन देऊन जिल्ह्यात लसीकरणाचा विक्रम नोंदविणाऱ्या आरोग्य विभागाने याच आठवड्यात शनिवारी एकाच दिवशी अवघ्या सात तासांत १६ हजार ९५५ व्यक्तींना कोविड व्हॅक्सिन देऊन नवा विक्रम नोंदवित आपण लसीकरण मोहिमेला आणखी किती गती देऊ शकतो याची क्षमताच सिद्ध करून दाखविली आहे. विशेष म्हणजे शनिवारी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी लसीकरण मोहिमेला स्वयंस्फूर्तच प्रतिसाद दिला.शुक्रवारी जिल्ह्याला कोविड लसीचे १८ हजार डोस मिळताच जिल्हा आरोग्य विभागाने लसीकरण मोहिमेला नव्या जोमाने गती देण्याचे निश्चित करून शनिवारी प्रत्यक्ष कृती केली. शनिवारी एकूण ९१ केंद्रांवरून लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. सकाळी ९ वाजतापासून प्रत्येक केंद्रावरून लस देण्यास सुरूवात झाली. सकाळपासूनच लस घेणाऱ्यांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती. शनिवारी दुपारी ५ पर्यंत लाभार्थ्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली असली तरी दुपारी ४ वाजेपर्यंत ९१ केंद्रांवरून तब्बल १६ हजार ९५५ व्यक्तींनी लस घेतल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. शनिवारी लसीकरण केंद्र बंद होईपर्यंत नेमक्या किती व्यक्तींना कोविड व्हॅक्सिन देण्यात आली याची आकडेवारी गोळा करण्याचे काम सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होते. शनिवारी जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर पुरुषांच्या बरोबरीने महिला तसेच तरुणींनीही स्वयंस्फूर्तीने कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली, हे विशेष.

६,४९८ व्यक्तींनी अपॉईमेंट घेवून घेतली व्हॅक्सिन- शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत तब्बल १६ हजार ९५५ व्यक्तींनी कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली असून यापैकी ६ हजार ४९८ व्यक्तींनी ऑनलाईन प्रणालीचा वापर करून अपॉईमेंट घेत नजीकच्या लसीकरण केंद्रावर जावून कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घेतल्याचे आारोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

शनिवारी जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला नव्या जोमाने गती देण्यात आली. नागरिकांनीही लसीकरण मोहिमेला स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिल्याने आज एकाच दिवशी १६ हजार ९५५ व्यक्तींना दुपारी ४ वाजेपर्यंत कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. दुपारी ५ पर्यंत किती लसीकरण झाले याची माहिती सध्या गोळा केली जात आहे.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी वर्धा.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस