दाभोळकरांच्या हत्येच्या तपासातील दिरंगाईबाबत ‘जवाब दो’आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 06:00 AM2019-08-23T06:00:00+5:302019-08-23T06:00:29+5:30

डॉ. दाभोळकर मॉर्निंग वॉक करीत असताना २० ऑगस्ट २०१३ ला सनातन संस्था व हिंदू जनजागृतीच्या साधकांनी गोळ्या झाडून हत्या केली. सीबीआयच्या अहवालाप्रमाणेच समितीचे मत सुरुवातीपासूनच होते; परंतु तपासयंत्रणांनी त्याकडे कानाडोळा केला. मात्र, तपासाअंती समितीचे भाकित खरे ठरले.

'Jawaab Do' agitation about the delay in investigation of Dabholkar murder | दाभोळकरांच्या हत्येच्या तपासातील दिरंगाईबाबत ‘जवाब दो’आंदोलन

दाभोळकरांच्या हत्येच्या तपासातील दिरंगाईबाबत ‘जवाब दो’आंदोलन

Next
ठळक मुद्देशासनाचा केला निषेध : शेकडोवर कार्यकर्त्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला सहा वर्षे झालीत तरी अद्यापपर्यंत त्यामागील सूत्रधारांना अटक झाली नाही. याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभर निषेध कार्यक्रम २० ऑगस्टला राबविण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा जिल्हा व देवळी तालुका शाखेतर्फे संयुक्तरीत्या ‘जवाब दो’ आंदोलनात वर्ध्यातील विविध चौकात धरणे, घोषणा, चळवळीची गाणी म्हणत निषेध व्यक्त करीत वर्धेकरांचे लक्ष वेधण्यात आले.
डॉ. दाभोळकर मॉर्निंग वॉक करीत असताना २० ऑगस्ट २०१३ ला सनातन संस्था व हिंदू जनजागृतीच्या साधकांनी गोळ्या झाडून हत्या केली. सीबीआयच्या अहवालाप्रमाणेच समितीचे मत सुरुवातीपासूनच होते; परंतु तपासयंत्रणांनी त्याकडे कानाडोळा केला. मात्र, तपासाअंती समितीचे भाकित खरे ठरले. याच काळात गोळ्या झाडणारे अनेक संशयित तरूण पकडल्या गेले. पण, त्यासाठी उच्च न्यायालयाला तपास यंत्रणेला खडसावे लागले. सहा वर्षे झालीत अजूनपावेतो तपास पूर्ण झाला नाही. उल्लेखित संस्थांची नावे तपासात असतानादेखील अजूनपर्यंत सूत्रधारांना अटक झाली नाही. याचा तीव्र निषेध म्हणून ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले.
आर्वी नाका चौकात दाभोळकरांच्या सूत्रधारांना केव्हा पकडणार? महाराष्ट्र शासन जवाब दो’ ‘फुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सारे दाभोळकर, जितेंगे, लढेंगे, विवेकाचा आवाज बुलंद करूया’ अशा घोषणा देत आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर राज्य कार्यकारिणीचे निमंत्रक सदस्य डॉ. सिद्धार्थ बुटले यांनी मार्गदर्शन केले. शिवाजी चौकात राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, सोशालिस्ट चौकात प्रकाश कांबळे यांनी मार्गदर्शन केले. तर बजाज चौकातील समारोपीय कार्यक्रमात ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. सुभाष खंडारे यांनी मार्गदर्शन केले. चळवळीचे गीत विजय पचारे, प्रा. डॉ. माधुरी झाडे, कविता राठोड, सचिन मेश्राम, भरत कोकावार, सुनील ढाले, सारिका डेहनकर यांनी सादर केलीत. यावेळी विश्वंभर वनकर, वसुधा वनकर, प्रा. नूतन माळवी, सुरेश बोरकर, आशीष हलगे उपस्थित होते.

Web Title: 'Jawaab Do' agitation about the delay in investigation of Dabholkar murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.