शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वीज पुरवठ्याअभावी सिंचन विहिरी कुचकामी

By admin | Updated: June 15, 2014 23:42 IST

शासनाने अत्यल्प व अल्प भुधारक शेतकऱ्यांना जवाहर सिंचन योजनंतर्गत विहिरी देण्याची योजना राबविली. या योजनेतून विहिरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा मिळण्यासाठी वीज कंपनीकडे

टाकरखेड : शासनाने अत्यल्प व अल्प भुधारक शेतकऱ्यांना जवाहर सिंचन योजनंतर्गत विहिरी देण्याची योजना राबविली. या योजनेतून विहिरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा मिळण्यासाठी वीज कंपनीकडे डिमांडचा भरणा केला; परंतु दोन वर्षांचा कालावधी लोटला तरीही त्यांना जोडणी मिळाली नाही. यामुळे ओलीताची सोय असतानाही कोरवाहू शेती करण्याची वेळ या भागातील शेतकऱ्यांवर आली आहे.सिंचनासाठी असणाऱ्या विहिरी केवळ विद्युत पुरवठ्याअभावी कुचकामी ठरत आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना सिंचन सुविधेचा लाभ व्हावा म्हणून सन २००९ मध्ये प्रत्येक तालुक्यात एक हजार विहिरी शंभर टक्के अनुदानावर खोदून देण्याचा धडक कार्यक्रम सुरू केला. या योजनेतून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचा शासनाचा प्रयत्न होता. अनेक लाभार्थ्यांनी एका लाखाच्या अनुदानातून तयार होण्याऱ्या विहिरींना आपल्या जवळची रक्कम खर्च करून पूर्ण केल्या. विहिरींना भरपूर पाणी लागले. या विशेष योजनेतील विहिरींना तातडीने वीज पुरवठा दिला जाईल असे फर्मान शासनाने सोडले होते. या विहिरीच्या करारनाम्यासोबत वीज जोडणी अर्जसुद्धा लावला होता.डिमांडची रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने वीजपुरवठा मिळेल असे कंपनीकडून सांगण्यात आले; पण दोन वर्षे लोटली तरीही वीज जोडणीचा पत्ता नाही. संबंधित विभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांच्या अनेक चकरा सुरू असून उडवाउडवीचे उत्तरे मिळते. यादी यायची आहे तर कधी कंत्राटदाराकडे काम दिले आहे. एकूणच कंपनीला शेतकऱ्यांचे काहीही घेणे देणे नसून वीज कंपनी केवळ वेळकाढू धोरण अवलंबित आहे. परिसरातील वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी त्रस्त झाला आहे. आता उन्हाळा संपला पावसाळा लागला. त्यामुळे आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. याकडे संबंधित कंपनीच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)