अधीक्षक अभियंत्यांकडून ‘कुऱ्हा’ जलाशयाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST2019-09-09T06:00:00+5:302019-09-09T06:00:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा/विरूळ (आकाजी) : रसुलाबाद नजीकच्या कुºहा जलाशयाच्या भिंतीला तडा गेल्याचे पुढे आल्यानंतर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ...

Inspection of 'Kurha' reservoir by Superintending Engineers | अधीक्षक अभियंत्यांकडून ‘कुऱ्हा’ जलाशयाची पाहणी

अधीक्षक अभियंत्यांकडून ‘कुऱ्हा’ जलाशयाची पाहणी

ठळक मुद्देप्रकल्पाच्या भिंतीला तडे गेल्याने नागरिकांमध्ये दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/विरूळ (आकाजी) : रसुलाबाद नजीकच्या कुºहा जलाशयाच्या भिंतीला तडा गेल्याचे पुढे आल्यानंतर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. काळे व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी जलाशयाची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर केला. तर रविवारी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी यांनी रसुलाबाद नजीकचा कुऱ्हा जलाशय गाठून जलाशयाला ज्या भागात तडे गेले त्या भागाची बारकाईने पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. विशेष म्हणजे जलाशयाच्या भिंतीला तडे गेल्याने नागरिकांमध्ये धरणफुटीबाबत कमालीची दहशत पसरली आहे.
रसूलाबाद नजीकच्या बाऱ्हा सोनेगाव व कुरझडी या गावाच्या मधात कुऱ्हा हा लघु जलाशय आहे. सुमारे ३७ हेक्टरवर पसरलेल्या या जलाशयाची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे ३ दलघमी असून तो सध्या १०० टक्के भरला आहे. अशातच पूर्णपणे मातीने तयार करण्यात आलेल्या या जलाशयाच्या भिंतींना तडा गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच नागरिकांची सुरक्षा या उद्देशाने महसूल विभागाच्यावतीने कुऱ्हा जलाशयाच्या पायथ्याशी असलेल्या बाºहा सोनेगाव येथील ४२ कुटुंबांतील १४३ व्यक्तींना रसुलाबाद येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात हलविण्यात आले आहे. शनिवारी नायब तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे, वर्धा पाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस.बी. काळे आदी अधिकाऱ्यांनी कुऱ्हा जलाशयाची पाहणी केली.
त्यानंतर रविवारी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी यांनी सदर जलाशयाची पाहणी केली. यावेळी वर्धा पाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस. बी. काळे, उपकार्यकारी अभियंता दामोदरे, तलाठी भोले, रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर, हुसेनपूरचे सरपंच रवी कुरसंगे, पोलीस पाटील श्याम काकडे, माजी सरपंच शफीकुर रहेमान, आनंद राठी यांची उपस्थिती होती.

Web Title: Inspection of 'Kurha' reservoir by Superintending Engineers

टॅग्स :Damधरण