शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘ई सेवा वर्धा डॉट इन’ वर मिळेल कोविड हॉस्पिटलमधील बेडची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 05:00 IST

 जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड बाधितांना जिल्ह्यातील कुठल्या रुग्णालयात आयसीयू, ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर रुग्णखाट उपलब्ध आहे याची माहिती घरबसल्या मिळावी या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्या होत्या. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांच्या मदतीने जिल्हाकचेरीत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हाकचेरीत नियंत्रण कक्ष स्थापन : जिल्हाधिकाऱ्यांची राहणार करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  कोविड रुग्णालयातील बेड उपलब्धता स्थितीची माहिती नागरिकांना सहज मिळावी म्हणून वर्धा जिल्हा प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. इतकेच नव्हे तर स्मार्ट फोनच्या सहाय्याने ‘ई सेवा वर्धा डॉट इन’ या संकेत स्थळावर जाऊनही नागरिकांना कोविड रुग्णालयातील रिकाम्या रुग्णखाटांची माहिती जाणून घेता येणार आहे. जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड बाधितांना जिल्ह्यातील कुठल्या रुग्णालयात आयसीयू, ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर रुग्णखाट उपलब्ध आहे याची माहिती घरबसल्या मिळावी या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्या होत्या. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांच्या मदतीने जिल्हाकचेरीत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षातील ०७१५२-२४३४४६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यावर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय, सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथील कोविड युनिटमध्ये कुठली रुग्णखाट उपलब्ध आहे, याची माहिती दिली जाणार आहे. जिल्ह्यातील कोविड स्थिती पाहता उभारण्यात आलेल्या या यंत्रणेवर उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार हे लक्ष ठेवणार आहेत. ‘ई सेवा वर्धा डॉट इन’ या संकेत स्थळावर प्रत्येक दोन तासांनी रुग्ण खाटांच्या उपलब्धतेबाबत इत्यंभूत माहिती अपलोड केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

प्रत्येक दोन तासांनी होणार अपडेशन जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा, सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय तसेच सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात किती रुग्णखाटा उपलब्ध आहेत. तसेच कुठल्या रुग्ण खाटेवर किती रुग्ण आहेत याची माहिती तिन्ही रुग्णालय प्रशासन प्रत्येक दोन तासांनी अपडेट करणार आहेत. या कामात हयगय करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाकडून कठोर कार्यवाही करण्याची भूमिकाही ठेवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड रुग्ण खाटा उपलब्धता नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. ०७१५२-२४३४४६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यावर नागरिकांना माहिती मिळणार आहे. तसेच ‘ई सेवा वर्धा डॉट इन’ या संकेत स्थळावर रुग्ण खाटा उपलब्धतेची माहिती मिळणार आहे.- प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल