शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

वाढते प्रदूषण ही चिंतेची बाब

By admin | Updated: April 17, 2016 01:59 IST

वाढते प्रदूषण सर्वांसाठीच चिंतेची बाब ठरली आहे. त्यामुळे प्रत्येकानेच नो व्हेईकल डे या उपक्रमात सहभाग घेऊन वाढत्या प्रदूषणाबाबत लोकांना अवगत केले पाहिजे.

रामदास तडस : ‘नो व्हेईकल डे’ उपक्रमातून जनजागृती
देवळी : वाढते प्रदूषण सर्वांसाठीच चिंतेची बाब ठरली आहे. त्यामुळे प्रत्येकानेच नो व्हेईकल डे या उपक्रमात सहभाग घेऊन वाढत्या प्रदूषणाबाबत लोकांना अवगत केले पाहिजे. तसेच स्वच्छता अभियानात योगदान देवून सुंदर व स्वच्छ शहरासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे विचार खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.
शनिवारी ‘नो व्हेईकल डे’ निमित्त स्थानिक न. प. प्राथमिक शाळा क्रमांक १ येथे प्रबोधन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून खा. तडस बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून न. प. शिक्षण सभापती बंडू जोशी, बांधकाम सभापती दिलीप कारोटकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कोल्हटकर, डॉ. श्रावण साखरकर, महालक्ष्मी टीएमटी प्रा.लि.चे प्रकाश दुधकोहळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी खा. तडस यांच्या उपस्थितीत शहरातून सायकल सायकल रॅली काढण्यात आली. याप्रंसगी प्रदूषणमुक्त समाज व्यवस्थेसाठी नारे देण्यात आले.
बहुतेक आजाराचे संक्रमण हातामुळे होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले हात स्वच्छ ठेवले पाहिजे. शारीरिक श्रम कमी करीत दिवसेंदिवस मोटारगाड्यांकडे लोकांचा कल वाढत आहे, असे विचार डॉ. कोल्हटकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सभापती जोशी व पोलीस निरीक्षक मदने यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक हरिदास ढोक यांनी केले. संचालन प्रा. पंकज चोरे तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका चंदा वरकड यांनी मानले.
यावेळी प्रा. शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता भगत, शिक्षक सुदर्शन चलाख, फरहतखान तबस्सुम, मोहम्मद अब्रार, प्रा. नितीन आचार्य, प्रा. शिवप्रसाद बागडे, शरद आदमने, अनूप कपूर, प्रवीण फटींग, सागर वानखेडे, गणेश शेंडे, अमर मुरार, निलेश डंभारे, सुजित झांबरे, अक्षय हिंगे, अविनाश फुलमाळी, सुदर्शन शंभरकर, अमन बटन, पवन आटे, देविदास कडूकर, गणेश कन्नाके, मंगेश साटोणे, चरण बोंडेकर, शिवा गोडबोले, सोहेल शेख, सुरेंद्र राठोड, गौरव सुरकार, करण तांबोडकर, दीक्षा चिचघाटे, आकांक्षा बेंदले, सीभरण वावरे, दीपक गोडबोले, क्षीतीज गोडबोले, समीर साहू, सौरभ लाडेकर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)