शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शहरात माफियांचे अवैध वाळूघाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST

सावंगी, पिपरी यासह शहरालगतच्या परिसरात सर्वाधिक साठे दिसतात. माफियांनी खुले ले-आऊट, अतिक्रमित जागा, हायवेलगतचा परिसर अशा ठिकाणी वाळूचे साठे केले आहे. यानंतरही तहसील प्रशासन गप्प आहे. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या वर्ध्यात महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून माफियांनी साठे ठेवले आहे. शहराच्या भोवताल माफियांचे जाळे पहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी वाळूसाठे ठेवण्यात आले, त्या ठिकाणी सर्वसामान्याला पोहोचता येत नाही. खुले ले-आऊट, बेवारस जागांवर असे साठे ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देतहसील प्रशासनाची कृपादृष्टी : राजरोस भरतात ट्रक-टिप्पर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवीन जलधोरणामुळे वाळूउपशावर बंदी आहे. वाळूघाटांचा लिलाव थांबला आहे. याचा फायदा घेत वाळूमाफियांनी वाळूघाटावर मिळणार नाही इतका साठा वर्धा शहराच्या चारही बाजूंनी केला आहे. जणू कृत्रिम वाळूघाट तयार केल्याचे चित्र पहावयास मिळते. याकडे महसूल प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. वाळूसाठ्याबाबत स्पष्ट शासन आदेश असतानाही कारवाई होत नाही.सावंगी, पिपरी यासह शहरालगतच्या परिसरात सर्वाधिक साठे दिसतात. माफियांनी खुले ले-आऊट, अतिक्रमित जागा, हायवेलगतचा परिसर अशा ठिकाणी वाळूचे साठे केले आहे. यानंतरही तहसील प्रशासन गप्प आहे. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या वर्ध्यात महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून माफियांनी साठे ठेवले आहे. शहराच्या भोवताल माफियांचे जाळे पहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी वाळूसाठे ठेवण्यात आले, त्या ठिकाणी सर्वसामान्याला पोहोचता येत नाही. खुले ले-आऊट, बेवारस जागांवर असे साठे ठेवण्यात आले आहे. यामुळे कारवाई झाली तरी ही आमची वाळू नाही, असे म्हणण्यासाठी माफिया मोकळे राहणार आहे.तहसील प्रशासनाने खुल्या जागेवरील सर्व वाळूचे साठे जप्त करण्याची गरज आहे. मात्र, प्रशासनाने अद्यापही कारवाई केली नाही. विशेष म्हणजे, सावंगी परिसरात आणि पिपरी भागातही वाळूचे साठे आहे. बायपासला लागून चौफुलीजवळ मोठा वाळूचा साठा आहे. दिवसाढवळ्या या ठिकाणावरून वाळू वाहनांमध्ये भरली जाते. शहरातील ‘ओपन स्पेस’ आणि शासकीय जागांवर अनेक ठिकाणी वाळूसाठे ठेवण्यात आले आहे. तर काही भागात वाळूचा उपसा करणाऱ्या बोटही खुलेआम ठेवण्यात आल्यात. याची माहिती महसूल विभागाला असताना कारवाई होत नाही, हे आश्चर्य.यशोदेच्या पात्रातून वाळूचोरीटाकळी (चणाजी) यथील यशोदा न दी व नाल्याच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळूचा उपसा केला जात असून यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. हा प्रकार अधिकाऱ्यांच्या लागेबांध्यातूनच होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रविवारी मध्यरात्री टाकळी (चणाजी) येथील कबड्डी मैदानावर मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा करण्यात आला. हा वाळूसाठा कुणाचा असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तसेच रविवारच्या रात्रीच सोनेगाव (बाई) येथील नाल्यातून जेसीबीच्या सहाय्याने वाळूचा उपसा करण्यात आला. यात देवळीतील झोरे नामक व्यक्तीचे नाव पुढे आले आहे.महसूल विभागातूनच कारवाईची खबरबंदीच्या काळात वाळूमाफियांचा मुक्त संचार सुरू आहे. या माफियांसोबत स्थानिक महसूल यंत्रणेतील एका महाभागाने आपली भागीदारी केली आहे. त्यामुळे कारवाईसंदर्भात कुठलीही हालचाल यंत्रणेकडून होत असेल तर याची पूर्वसूचना सोईस्करपणे आपल्या भागीदार वाळूमाफियांना दिली जाते. काही दिवसांपूर्वी वर्धा तालुक्याबाहेरील वाळू ट्रकवर कारवाई झाली. त्यातही मापात पाप करीत आपल्या जवळच्या ट्रकला कमी दंड तर इतरांवर दाम दुप्पट दंड आकारले. हा प्रकार वरिष्ठांच्या डोळ्यात धूळफेक करून सुरू आहे.

टॅग्स :Thiefचोर