शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एक ट्रक गुटखा जाळला तर दुसऱ्या ट्रकमधील मालाची विल्हेवाट

By admin | Updated: September 10, 2014 23:53 IST

अन्न सुरक्षा व मानक विभागाच्यावतीने नागपूर विभागात जप्त केलेला गुटखा तंबाखूचे दोन ट्रक येथील डिजी आर्चड या सोयाबीन प्रकल्पात जाळून नष्ट करण्यासाठी आणला; पण एकाच ट्रकमधील

हिंगणघाट : अन्न सुरक्षा व मानक विभागाच्यावतीने नागपूर विभागात जप्त केलेला गुटखा तंबाखूचे दोन ट्रक येथील डिजी आर्चड या सोयाबीन प्रकल्पात जाळून नष्ट करण्यासाठी आणला; पण एकाच ट्रकमधील गुटखा तंबाखू या उद्योगाच्या परिसरात जाळण्यात आला़ एका ट्रकमधील गुटखा तंबाखूची परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार पूढे आल्याने खळबळ माजली आहे.प्राप्त माहितीनुसार, आरोग्यास हानीकारक गुटखा, तंबाखूच्या वापर व विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे. या अनुषंगाने अन्न सुरक्षा व मानक विभागाच्या अधिकाऱ्यांनी विदर्भात ठिकठिकाणी जप्तीची मोहीम राबवून प्रचंड प्रमाणात जप्ती केली होती. सदर मालाची किंमत सुमारे ५५ लाख रुपये असल्याचे समजते. हा माल जाळून नष्ट करण्यासाठी हिंगणघाट येथील वर्धा रोडवर स्थित डि.जी. आर्चड्स या उद्योगाची निवड करण्यात आली. त्यानुसार रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जप्तीचा ट्रक येथे आणण्यात आला. सदर मालापैकी एका ट्रकमधील काही माल या उद्योगाच्या मागील बाजूला तीन ठिकाणी उघड्यावर जाळण्यात आला. सदर माल जाळून नष्ट करीत असताना कर्मचारी तसेच काही ग्रामस्थांनी काही माल लंपास केला तर दुसऱ्या ट्रकमधील चांगला माल स्थानिक लोकल ट्रकमध्ये भरून रात्री ११ वाजताच्या सुमारास त्याची विल्हेवाट लावल्याची माहिती पूढे आली आहे़ आधी पैसे, नंतर माल या तत्वावर मोहता चौकातील एका व्यापाऱ्याला सदर माल विकल्याचीही शहरात जोरदार चर्चा आहे. यात डि.जी. आर्चड्सचे विष्णू व रवींद्र हे दोन अधिकारी गुंतले असल्याची चर्चा आहे़ या प्रकरणाची उच्चस्तरीय तपासणी करणे गरजेचे आहे़ पानठेले व घाऊक व्यापाऱ्यांकडून जप्त गुटखा, तंबाखूमध्येही घोळ केला जात असल्याचेच या प्रकारातून स्पष्ट झाले आहे़(तालुका प्रतिनिधी)