शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राम-सावंगी रुग्णालयातील ऑक्सिजनसह आयसीयू बेड फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 05:00 IST

सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील कोविड युनिटमधील आयसीयू विभागात २० रुग्णखाटा आहेत. त्यापैकी तब्बल १९ खाटांवर सध्या कोविड बाधित उपचार घेत असून केवळ एकच रुग्णखाट शिल्लक आहे. तसेच ऑक्सिजनच्या एकूण १८५ रुग्णखाटा असून या सर्वच रुग्णखाटांवर सध्या ॲक्टिव्ह कोविड बाधित असून त्यांना चांगला उपचार देण्यासाठी कस्तुरबातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाची वाढली चिंता : गाफील वर्धेकरांनी दक्ष होण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संकटाच्या काळात वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय तर सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड युनिटमधील ऑक्सिजन आणि आयसीयू बेड फुल्ल झाल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. हळूहळू का हाेई ना पण जिल्ह्याची कोविड परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने आतातरी गाफील वर्धेकरांनी दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचेच आहे.सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील कोविड युनिटमधील आयसीयू विभागात २० रुग्णखाटा आहेत. त्यापैकी तब्बल १९ खाटांवर सध्या कोविड बाधित उपचार घेत असून केवळ एकच रुग्णखाट शिल्लक आहे. तसेच ऑक्सिजनच्या एकूण १८५ रुग्णखाटा असून या सर्वच रुग्णखाटांवर सध्या ॲक्टिव्ह कोविड बाधित असून त्यांना चांगला उपचार देण्यासाठी कस्तुरबातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. तर सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील काेविड युनिटमधील आयसीयू विभागात एकूण ३१ रुग्णखाटा आहेत. यापैकी ३० रुग्णखाटांवर कोविड बाधित असून केवळ एकच बेड रिक्त आहे. तर याच रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये एकूण ३२० ऑक्सिजन बेड असून तब्बल ३१८ खाटांवर रुग्ण असून केवळ दोन रुग्णखाटा रिक्त आहेत. वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या दोन्ही हॉस्पिटलमधील रुग्णखाटा झपाट्याने फुल्ल होत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाने वेळीच योग्य पाऊल उचलून पर्यायी व्यवस्था उभी करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयाने पाच व्हेंटिलेटर नुकतेच सेवाग्राम येथील रुग्णालयाला दिले आहे.

केवळ शासकीय रुग्णालयातच ऑक्सिजनच्या रुग्णखाटा उपलब्धजिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये एकूण १०० ऑक्सिजन बेड आहेत. त्यापैकी १९ खाटांवर ॲक्टिव्ह कोविड बाधित उपचार घेत असून उर्वरित ८१ खाटा रिक्त आहे. तर आर्वी आणि हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात अनुक्रमे ३० आणि ६० ऑक्सिजन बेड असून ते पूर्णपणे रिकामे आहेत. 

अन्यथा स्मशानशेडही पडणार अपुरेवर्धा जिल्ह्यात कोविडचा प्रसार झपाट्याने होत आहे. इतकेच नव्हे तर सेवाग्राम आणि सावंगी येथील रुग्णालयातील आयसीयू आणि ऑक्सिजन बेड फुल्ल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर वेळीच पर्यायी व्यवस्था न उभी केल्यास वर्धा जिल्ह्यातील कोविड मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वर्धेतील वैकुंठधामातील आरक्षित केलेले स्मशानशेडही अपुरे पडण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या