शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
4
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
5
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
6
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
7
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
8
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
9
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
10
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
11
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
12
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
13
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
14
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
15
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
16
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
17
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
18
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
19
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
20
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 04:36 IST

घरगुती भांडणातून पत्नीची हत्या करत पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घाटकोपरमध्ये गुरुवारी घडली

मुंबई : घरगुती भांडणातून पत्नीची हत्या करत पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घाटकोपरमध्ये गुरुवारी घडली. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी पती शिवशंकर विश्वकर्मा (४५)विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घाटकोपर पूर्वेकडील रमाबाई कॉलनी परिसरात चंद्रकला विश्वकर्मा (४०) ही पती आणि दोन मुलांसोबत राहायची. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्यात खटके उडत होते. याबाबत चंद्रकलाने तिच्या माहेरच्यांना सांगितले. १५ दिवसांपूर्वीच गावी आलेल्या शिवशंकरला बैठक घेऊन समजविण्यात आले.

घरगुती भांडणात माहेरच्यांनी मध्यस्थी घेतलेली शिवशंकरला आवडली नाही. त्यामुळे त्यांच्या भांडणात भर पडली. गुरुवारी सकाळी ७च्या सुमारास यावरून दोघांमध्ये वाद झाले. याच रागात शिवशंकरने घरातील चाकूने तिच्या मानेवर वार केले. त्यानंतर स्वत:च्या पोटावर चाकू मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. स्थानिकांच्या मदतीने दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे चंद्रकलाला मृत घोषित करण्यात आले. तर शिवशंकरवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चंद्रकलाच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवशंकरविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पंतनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहिणी काळे यांनी दिली.