शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वेतनाविना अग्निशमनच्या कर्मचार्‍यांवर उपासमार

By admin | Updated: June 9, 2014 00:04 IST

मांडवा येथील लॅन्को प्रकल्पाच्या अग्निशमन दलामध्ये काम करणार्‍या तीन कर्मचार्‍यांना १५ महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. यामुळे सदर कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांची आर्थिक कोंडी झाली आहे.

वर्धा : मांडवा येथील लॅन्को प्रकल्पाच्या अग्निशमन दलामध्ये काम करणार्‍या तीन कर्मचार्‍यांना १५ महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. यामुळे सदर कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्वरित वेतन देण्यात यावे, अशी मागणी कर्मचार्‍यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.वेतन न मिळालेल्या कर्मचार्‍यांमध्ये चंद्रकांत पिंजरकर, गणेश खराबे आणि विलास बावणे यांचा समावेश आहे. मांडवा येथील लॅन्को विदर्भ थर्मल पॉवर प्रकल्पाच्या ‘एडप्रो फायर सर्व्हिसेस’मध्ये हे कर्मचारी कामावर आहेत. मागील तीन वर्षांपासून कंपनी त्यांची सेवा घेत आहे; पण या कर्मचार्‍यांना मार्च २0१३ ते मे २0१४ पर्यंतच्या कामाचे वेतन अदा करण्यात आलेले नाही. वेतन न मिळाल्याने त्यांच्यासमोर कुटुंबाचा चरीतार्थ कसा चालवावा, असा प्रश्न उभा ठाकला आहे. वेतन मिळावे म्हणून सदर कर्मचार्‍यांनी कंपनीच्या कंपनी प्रशासनाला वारंवार निवेदन दिले. तोंडी मागणीही नोंदविली; पण कर्मचार्‍यांच्या या मागणीची दखल घेत त्यांना वेतन देण्यात आलेच नाही. येथील कर्मचार्‍यांनी २३ मे २0१२ रोजी तळेगाव (रघुजी) येथील अरावली एक्स्प्लोझिव्हमध्ये लागलेल्या आगीच्या वेळी, २४ जून रोजी तेथील मृतदेह बाहेर काढण्याच्या कामात, २0 जानेवारी २0१३ रोजी रात्री ११.३0 वाजता वध्र्याच्या साई ऑटोमोबाईल या तीनमजली दुकानाला लागलेल्या आगीच्या वेळी, सात मे १४ रोजी देवळी येथे जिनिंगला लागलेल्या आगीच्या वेळी, दोन जून २0१४ रोजी आर्वी-तळेगाव मार्गावरील जगदंबा जिनिंगला लागलेल्या आगीच्या वेळी या कर्मचार्‍यांनी जीवाची बाजी लावीत आग विझविण्याचे काम केले आहे. पण त्यांनाच मागील सुमारे दीड वर्षांपासून वेतन न मिळाल्याने जगण्याचा संघर्ष करावा लागत आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनांचीही कोणी दखल घेत नाही, अशी या कर्मचार्‍यांची सध्याच्या अवस्था असून त्यांच्याबाबत सुरू असलेली उपेक्षा मुख्यमंत्र्यांनीच हस्तक्षेप करून थांबवावी, अशी मागणी या कर्मचार्‍यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून केली आहे. वेतनआभावी कर्मचारी सध्या जीवन मरणाचा संघर्ष सहकुटुंब करीत आहेत. दैनंदीन खर्चाचीही आमची व्यवस्था नाही. आम्ही इतरांच्या मतदतीला धावून गेलो, आता आमच्या जगण्याच्या संघर्षात शासनाने आम्हाला मदत करण्यास पुढे यावे व आम्हाला वेतन देण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी केली आहे. यावेळी चंद्रकांत पिंजरकर, गणेश खराबे, विलास बावणे यासह  अन्य कर्मचार्‍यांनी निवेदन सादर केले.(स्थानिक प्रतिनिधी)