गृहिणींचा स्वयंपाक पुन्हा पारंपरिक चुलीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 05:00 AM2020-02-25T05:00:00+5:302020-02-25T05:00:24+5:30

सिलिंडरच्या सततच्या वाढत्या किंमतीमुळे गॅस सिलिंडरचा वापर केवळ चहा करण्यासाठी करीत आहेत. ग्रामीण व अतिदूर्गम भागात या योजनेद्वारे गॅस पोहोचले असले तरी महिला वाढत्या दराच्या भीतीने अद्यापही चुलीवरच स्वयंपाक करताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करुन इंधनाचा वापर केला जातो. यामुळे वायुप्रदूषणाबरोबर पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. गरीब व सर्वसामान्य कुटूंबातील महिलांना चुलीवर स्वयंपाक करताना अतिशय त्रास होतो. यामुळे डोळ्याचा व श्वसनाचा आजार होऊन आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो.

Housewife's cooking is back to traditional choli | गृहिणींचा स्वयंपाक पुन्हा पारंपरिक चुलीवरच

गृहिणींचा स्वयंपाक पुन्हा पारंपरिक चुलीवरच

Next
ठळक मुद्देसिलिंडरच्या किंमतीत प्रचंड वाढ : उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क
समुदपूर : केंद्रशासनाच्यावतीने चुलीच्या धुरापासून महिलांची मुक्तता व्हावी, यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअतंर्गत लाखो कुटूंबांना गॅस जोडणी दिली. जिल्ह्यातील ग्रामीण व अतिदूर्गम भागातील कुटुंबांना याचा लाभ मिळाला. मात्र सध्या सिलिंडरच्या किंमती आवाक्याबाहेर असल्याने किंमतीला कंटाळून गृहिणी पुन्हा पारंपरिक चुकीकडेच वळतांना दिसून येत आहे.
सिलिंडरच्या सततच्या वाढत्या किंमतीमुळे गॅस सिलिंडरचा वापर केवळ चहा करण्यासाठी करीत आहेत. ग्रामीण व अतिदूर्गम भागात या योजनेद्वारे गॅस पोहोचले असले तरी महिला वाढत्या दराच्या भीतीने अद्यापही चुलीवरच स्वयंपाक करताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करुन इंधनाचा वापर केला जातो. यामुळे वायुप्रदूषणाबरोबर पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. गरीब व सर्वसामान्य कुटूंबातील महिलांना चुलीवर स्वयंपाक करताना अतिशय त्रास होतो. यामुळे डोळ्याचा व श्वसनाचा आजार होऊन आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
त्यामुळे सिलिंडरचे दर कमी करण्याची मागणी समीक्षा मांडवकर व सुजाता बाभूळकर यांच्यासह गावातील महिलांनी केली आहे.

सिलिंडर अडगळीत अन् केरोसिनही बंद
शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस जोडणी योजने अंतर्गत मोफत गॅस जोडणी देण्यात आली. बहुतांश घरात गॅस जोडणी दिली मात्र, त्यामुळे त्या कुटुंबाचा रेशनकार्डवरील रॉकेलचा पुरवठा बंद झाला.रॉकेल मिळेना, सिलिंडरचे भाव वाढले. त्यामुळे सिलिंडर खरेदी करणे महागात पडत आहे. परिणामी ग्रामीण भागातील अनेक सिलिंडर अडगळीत पडले असल्याचे दिसून येत आहे. भाव वाढल्यामुळे सिलिंडर खरेदी करता येत नाही आणि राशनकार्डवरील रॉकेलही मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Housewife's cooking is back to traditional choli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.