शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत ३०० वर फळबागा

By admin | Updated: March 31, 2017 01:55 IST

केळी बागायतदारांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या सेलू तालुक्यात केळीच्या बागा नामशेष होत आहे.

शेतकऱ्यांचा कल फळबाग लागवडीकडे : तालुक्यातील केळीच्या बागा मात्र नाममात्रविजय माहुरे   घोराडकेळी बागायतदारांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या सेलू तालुक्यात केळीच्या बागा नामशेष होत आहे. असे असले तरी तालुक्यातील शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहेत. परिणामी, मागील पाच वर्षांत ३०० च्या वर फळबागा तालुक्यात बहरल्या आहेत. बारमाही ओलिताची शेती असलेल्या या तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जात होते. महागडा खर्च, १८ महिन्यांचे पीक आणि अल्प भाव पाहता मागील दहा वर्षांमध्ये केळीच्या बागा नामशेष होत आहेत. असे असले तरी पाच वर्षांमध्ये शासनाच्या सिंचन व धडक विहीर योजनेचा लाभ मिळालेले शेतकरी बागायती शेती करण्याकडेच वळत असल्याचे दिसते. यामुळेच शासनाने फळबाग योजना सुरू केली. यात निंबु, संत्रा, मोसंबी, डाळींब या फळांचा समावेश होता. २०१२-१३ पासून ही योजना आजही सुरू आहे. यासाठी शासन तीन वर्षांपर्यंत अनुदान देते. फळबागेसाठी रोपटे शेतात लावल्यानंतर ३ ते ५ वर्षांपर्यंत आंतर पीक घेता येत असल्याने शेतकऱ्यांना परवडणारी शेती करता येते. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेत फळबागा फुलविल्या आहेत. प्रारंभी लावलेल्या फळबागांपासून उत्पन्न मिळण्यास सुरुवातही झाली आहे. शेतकऱ्यांचा कल फळबागांकडे असल्याने पं.स. कृषी विभागात ते योजनांची माहिती घेताना दिसतात. पारंपरिक शेती करणारा शेतकरी खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने आर्थिक सुबत्तेसाठी जोडधंदा करतात; पण तरी कर्जातच जगतात. यामुळेही तरूण शेतकरी शेती हा व्यवसाय समजून करीत असून फळबाग, फुलशेतीकडे वळलेत. यात शेडनेट व अन्य नव्या तंत्रज्ञानाची भर पडली आहे. केळीच्या बागा नामशेष झाल्या असल्या तरी फळबागांच्या माध्यमातून बागायती तालुका म्हणून गतवैभव प्राप्त होण्यास वाव आहे.