शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

उम्मीदो वाली ग्रूव्ह, सनशाईन वाली आशा

By admin | Updated: August 4, 2014 23:53 IST

शासनाने स्त्री शिक्षणाची आवश्यकता ओळखून मुली शिक्षित व्हाव्या, यासाठी अनेक योजना आखल्या. शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले. मुलींची शिक्षणातील गती आणि प्रगती वाढली. यामुळे ग्रामीण भागातही

दिलीप चव्हाण - सेवाग्रामशासनाने स्त्री शिक्षणाची आवश्यकता ओळखून मुली शिक्षित व्हाव्या, यासाठी अनेक योजना आखल्या. शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले. मुलींची शिक्षणातील गती आणि प्रगती वाढली. यामुळे ग्रामीण भागातही मुली गरूडझेपही घेत आहेत; मात्र गावखेड्यातून शिक्षण घेत असलेल्या सावित्रीच्या लेकींची फरफट थाबलेली नाही. पण याही स्थितीत ‘उम्मीदो वाली ग्रूव्ह, सनशाईन वाली आशा’ याप्रमाणे त्यांची शिक्षणाची जिद्द सुरू आहे. एकमेकींचा हात हाती घेत शिकण्यासाठी सेवाग्राम, हमदापूर येथील मुलींची धडपड सुरू आहे. सेवाग्राम आणि हमदापूर येथे अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. हमदापूर येथील शाळेत उंबरा, वायगाव, रज्जकपूर, नंदपूर, परसोडी, पार्डी, शिवणगाव, पहलनपूर, आलगाव, बोंडसूला, देर्डा, आष्टा, नांद्रा, बावापूर, जेजूरी, देऊळगाव, चानकी व कोपरा आदी गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. तर सेवाग्राम येथील शाळेत वरूड (रे.), औद्योगिक वसाहत, अंबानगर, करंजी (भोगे) व काजी, नागापूर, नांदोरा या गावातील विद्यार्थी येतात. या मार्गांवरून शाळेत येताना साधारण बसशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ११ वाजता शाळेत येण्यासाठी या मुलींना सकाळी आठ वाजताच डबा घेऊन घरून निघावे लागते. पाच वाजता शाळा सुटल्यावर बसअभावी घरी जातपर्यंत अनेकद त्यांना रात्र होते. या शाळांमध्ये शिकत असलेल्या बहुतेक सवित्रीच्या लेकी या सामान्य कुटुंबातील आहे. बहुतेकीचे पालक हे रोजमजुरी करणारे. मुलींना मोफत बसची पास आहे, पण याचा फारसा उपयोग नाही. काही गावात परिवहन महामंडळाची बस नसल्याने अनेक अडचणी व समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांमुळे एखादी मुलगी माघारही घेते. शिक्षणाचा मार्गही सोडते. अनेकदा वेळ झाल्यामुळे या सावित्रीच्या लेकीं एकमेकींना धीर देत आठ आठ किलोमिटर पायी घरी जावे लागते. यावेळी त्यांचा बाप डोळ्यात पाणी आणत तिची वाट पाहत असल्याचे वास्तव आहे. या मुलींमध्ये एवढे बळ कुठून येत असेल याबाबत मुक्त संवाद साधला असता इच्छाशक्ती, शिक्षणाची धडपड आणि एकमेकींचा साथ यावरच ही शिक्षणाची धडपड असल्याचे मत त्या व्यक्त करतात. पालक शेतकरी, मजूर असल्याने शैक्षणिकदृष्ट्या ते लक्ष देवू शकत नाही. तसेच फारशी आर्थिक मदत सुद्धा ते करू शकत नसल्याने जवळपास सर्वच मुली शाळा, अभ्यास सांभाळून सुट्टीच्या दिवशी शेतीच्या कामाला जातात. परिस्थितीनेच शहाणपण आल्याचे त्यांच्यासोबत बोलताना जाणवते. वृषाली, अंकिता, स्नेहल, प्राजक्ता, दिप्ती, प्रतीक्षा, संगीता, माधुरी, मोनिका, सुष्मिता, प्रिया, आरजू, करीना, रोहिणी या ना अनेक सावित्रीच्या लेकींचा यात समावेश आहे.