होम क्वारंटाईन कामगार स्वगावी जाण्यास आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST2020-04-01T05:00:00+5:302020-04-01T05:00:13+5:30

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांना कलम १४४ नुसारघराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सारा देश लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्याअनुषंगाने राज्य व जिल्ह्यात सीमाबंदी करण्यात आली आहे. मात्र, राज्य व अनेक जिल्ह्याच्या बंद सीमा ओलांडत हिंगणघाटवरून राष्ट्रीय महामार्गाने जाणाऱ्या ट्रकला अडवून ५८ कामगारांना ताब्यात घेतले होते.

Home quarantine workers insist on going to heaven | होम क्वारंटाईन कामगार स्वगावी जाण्यास आग्रही

होम क्वारंटाईन कामगार स्वगावी जाण्यास आग्रही

ठळक मुद्देजीबीएमएम, कमला नेहरू शाळेत क्वारंटाईन : विविध स्वयंसेवी संस्थांकडून जेवणाची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील राष्ट्रीय महामार्गावरून नागपूरमार्गे अन्य राज्यात जाणाऱ्या व शहरात फिरणाºया निराधार ९० लोकांना पोलिसांनी ताब्यात घेत शहरातील तीन ठिकाणी त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, यापैकी अनेकांनी जेवणाला नकार देत स्वगावी पोहोचविण्याचा आग्रह धरल्याची माहिती आहे.
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांना कलम १४४ नुसारघराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सारा देश लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्याअनुषंगाने राज्य व जिल्ह्यात सीमाबंदी करण्यात आली आहे. मात्र, राज्य व अनेक जिल्ह्याच्या बंद सीमा ओलांडत हिंगणघाटवरून राष्ट्रीय महामार्गाने जाणाऱ्या ट्रकला अडवून ५८ कामगारांना ताब्यात घेतले होते. हे कामगार चेन्नई व हैदराबादकडून नागपूरमार्गे ग्वालियर व राजस्थानकडे ट्रक व कंटेनर अशा तीन वाहनांतून जात होते.
या कामगारांना जीबीएमएम हायस्कूल व कमला नेहरू शाळेमध्ये तर शहरात फिरणाºया ३१ निराधारांना वसंत लॉन येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे.
त्यांची आरोग्य तपासणी करून भोजनाची व्यवस्था नारायण सेवा मंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, निरंकारी सेवा मंडळ, रोटरी क्लब अशा अनेक सेवाभावी संस्थांनी केली आहे. या क्वारंटाइनमध्ये मध्ये स्त्री-पुरूष व लहान मुलांचासुद्धा समावेश आहे. यापैकी काहींनी जेवण नाकारत मुलाबाळांच्या विरहापोटी आपापल्या गावी जाण्यासाठी आग्रह धरून असल्याची माहिती आहे.

Web Title: Home quarantine workers insist on going to heaven