शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शिवकार्याचा इतिहास रक्तरंजीत आहे

By admin | Updated: June 15, 2014 23:43 IST

आज जेवढी गरज शिवबाची आहे, त्यापेक्षा जास्त गरज आहे ती शहाजी राजे आणि जिजामाताची! कारण, जोपर्यंत हे घडत नाही, तोपर्यंत शिवाजी घडूच शकत नाही़ आज आपला २५ वर्षांचा तरूण पोरगा काय करीत आहे,

शिवराज्याभिषेक सोहळा : व्याख्याते श्रीनिवास पेंडसे यांचे प्रतिपादनहिंगणघाट : आज जेवढी गरज शिवबाची आहे, त्यापेक्षा जास्त गरज आहे ती शहाजी राजे आणि जिजामाताची! कारण, जोपर्यंत हे घडत नाही, तोपर्यंत शिवाजी घडूच शकत नाही़ आज आपला २५ वर्षांचा तरूण पोरगा काय करीत आहे, हे देखील आजच्या पित्यांना माहिती नसते़ या उलट शहाजी राजे यांनी शिवबा जेव्हा दीड वर्षांचे होते तेव्हाच हे विधान केले होते की, स्वराज्याचे निर्माण, हिंदुराज्याचे निर्माण माझा शिवबा करेल! असा त्या माता पित्यांचा आपल्या मुलावर असलेला दृढ विश्वास! शिवकार्य हे सोपे कार्य नव्हे व या कार्याचा इतिहास हा रक्तरंजीत इतिहास आहे, असे प्रतिपादन श्रीनिवास पेंडसे रत्नागिरी यांनी केले़सत्कर्म सामाजिक संस्था हिंगणघाट आणि श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने येथे वर्धा जिल्ह्यात प्रथमच शिवतिर्थावर (शिवाजी पार्कमध्ये) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले़ यानंतर शिवाजी महाराजांचे जीवन व कामगिरीवर आयोजित व्याख्यानात श्रीनिवास पेंडसे रत्नागिरी बोलत होते़ सोहळ्यात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला सुधीर पांडे व त्यांच्या चमूद्वारे पारंपरिक पद्धतीने बोकारे दाम्पत्याकरवी अभिषेक करण्यात आला़ या सोहळ्याच्या आयोजनाबद्दल समीर कुणावार यांनी सत्कर्म सामाजिक संस्थेचे आभार मानले़ हे शिवकार्य दरवर्षी या पावन तिर्थावर घडत राहावे, असे सांगितले़ संचालन अमीत म्हैसेकर यांनी केले़ सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सत्कर्मचे अध्यक्ष आशिष जैन, पदाधिकारी, राजे संघटना, साई मंदिर देवस्थान संस्था, रोशन नागमोते, उमेश बुराडे, रूपेश लाजुरकर, चाफले, खेनवाल, आदींनी सहकार्य केले़(तालुका प्रतिनिधी)